मुख्यमंत्र्याच्या सभेत औसात घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

औसा :  मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप करत लातूर जिल्ह्यातील औसा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फलक झळकावत घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

औसा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी (ता. 11) दुपारी औसा येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ठोस निर्णय होत नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावण्याचा इशारा "छावा'चे नानासाहेब जावळे यांनी दिला होता. त्यानुसार दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांची सभा येथील मुक्तेश्‍वर विद्यालयाच्या मैदानावर सुरू असताना "छावा'च्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा लिहिलेले फलक झळकावल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांवर झडप घालत 13 जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा सुरळीत पार पडली.

Web Title: maratha reservation slogans in cm speech