निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मराठा समाजाची दिशाभूल - पुरुषोत्तम खेडेकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

उमरगा - मराठा समाजाला दिलेले आरक्षण घटनाबाह्य आहे. सर्वच राजकीय पक्षांचा यात स्वार्थ असून, आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मराठ्यांची दिशाभूल करणारा हा राजकीय निर्णय आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले तरच आम्ही जगात देव आहे असे समजू, असे मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले.

मराठा सेवा संघाच्या वतीने शुक्रवारी (ता. 28) पालिकेच्या सभागृहात आयोजित संवाद मेळाव्यात खेडेकर बोलत होते. या वेळी मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे आदी उपस्थित होते.

खेडेकर म्हणाले, की ज्या मराठ्यांनी कुणबी असलेले दाखले काढले आहेत, त्यांना ओबीसींचे सर्व आरक्षण लागू आहे. महिलांनी न्यूनगंड बाजूला सारून पुढे आले पाहिजे. विधवा मुलींच्या पुनर्विवाहासाठीही समाजाचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे.

Web Title: Maratha Society Reservation Election Confussion Purushottam Khedekar