#MarathaKrantiMorcha परळीत बंद दरम्यान दोघांना जबर मारहाण

parali.
parali.

परळी - मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. २४) जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, बंदच्या कारणावरुन परळीत दोघांना जबर मारहाण झाली असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. 

परळीत तणावपूर्ण शांतता असून, कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मेगा भरती थांबवावी या मागणीसाठी बुधवारी (ता. १८) परळीत पहिला मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. त्यानंतर ठोस निर्णय होईपर्यंत माघार नाही, असा पवित्रा घेत आंदोलनकर्त्यांनी सुरु केलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी (ता. २४) सातव्या दिवशीही सुरुच आहे. 

दरम्यान, या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले असून सोमवारी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी पात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली. आंदोलनकर्त्यांनी निवेदनात जलसमाधीचा इशारा देऊनही प्रशासनाने गांभीर्य दाखविले नाही. त्यामुळेच काकासाहेब शिंदेला जीव गमवावा लागला. याच्या निषेधार्थ मंगळवारी राज्यात बंद पुकारण्यात आला. परळीत बंदचे आवाहन करत युवकांनी दुचाकी फेरी काढली. यावेळी शहरातील बरकत नगर भागात फेरी पुढे गेल्यानंतर मागे राहीलेल्या आकाश चव्हाण व साहेब देशमुख या दोघांवर दगडफेक करुन जखमी करण्यात आले. डोक्यात व छातीत दगड लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी परळीतून अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. यावेळी दुचाकींचीही तोडफोड करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला. परळीत सध्या तणावपूर्ण शांतता असून तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com