#MarathaKrantiMorcha जिल्ह्यात तीनशेहून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल 

#MarathaKrantiMorcha  Criminal cases filed for over 300 protesters in the district
#MarathaKrantiMorcha Criminal cases filed for over 300 protesters in the district

नांदेड: सकल मराठा आंदोलकांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी जवळपास तिनशेहून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात बाहेर जिल्ह्यातील अनेक आंदोलकांचा सहभाग आहे. यात जवळपास 25 लाख रुपयाच्या सार्वजनीक व खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी जिल्हाभरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात आंदोलकांवर दंगा घडविणे, दंग्यास चेतावणी देणे, मालमत्तेचे नुकसान करणे, जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे उल्लघंन करणे, मुंबई पोलिस कायदायासह आदी कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. 

यांच्यावर झाले गुन्हे दाखल
बालाजी हिंगोले, प्रभाकर हिंगोले, दत्ता राजेगोरे, प्रणव शिंदे, मारोती पवळे, संतोष भरकडे, दिनेश मोरे, चांदु मुळे, भूजंग पाटील, दत्ता कोकाटे, बालासाहेब देशमुख, रुपेश पावडे, महादेव पावडे, धोंडू पाटील, बालाजी कल्याणकर, उमेश मुंडे, रुद्र पाटील, गिरीष जाधव, गणेश शिंदे, रेखा चव्हाण, राजेश मोरे, शाम वडजे, विरेंद्र भंडारे, मारोती पाटील, नेताजी भोसले, पप्पु जाधव, महेश जाधव, आपूर्वा पाटील, विकास देशमुख आणि संकेत पाटील, दिलीप पाटील बेटमोगरेकर, सदाशिव पाटील, अानंद पाटील, रामदास पाटील, रियाज शेख, गोविंद पाटील, संतोष हिंगोले, गोविंद डुमने, भालचंद्र पेठवडजकर, सुरेश चिखलीकर, अंतय्श्‍वर पाटील, प्रसाद पाटील, संभाजी अटाळकर, मधुकर पाटील, अंबादास पाटील (पूणे), रमेश केटे ( औरंगाबाद), महेश डोंगरे (सोलापूर), संजय सावंत (बीड), विवेकानंद बाबर (सातारा), सुनील नागणे (तुळजापूर), अमीत धाडगे (परळी), सुभाष हंबर्डे, अप्पाराव हंबर्डे, उध्दव हंबर्डे, कैलास कदम, आबासाहेब पाटील, भगवान पावडे, गणेश व्यवहारे, बालाजी शिंदे, गंगाराम व्यवहारे, ज्ञानेश्‍वर पवार, अमोल काळे, बालाजी नादरे, विरेंद्र शिंदे, शिवानंद पवार, दिपक पाटील, विजय देशमुख, निर्मुल पवार, परमेश्‍वर पवार, बाळु शिंदे, गोविंद आरसोड, अरूण दिवसे, अमोल पवार, प्रदीप कोल्हे, गजानन जाधव, अरून कऱ्हाळे, संतोष गरड, साई पाटील, संतोष रेंगे, राहूल मगर, नितीन खरे, संतोष भरकड यांच्यासह जवळपास तीनशेहून अधिक आंदोलकांवर वजिराबाद, भाग्यनगर, नांदेड ग्रामिण, बारड, किनवट, मुखेड, कंधार आणि उस्माननगर ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com