औरंगाबादेत इंटरनेट बंद; औरंगाबाद जिल्ह्यात बंदला मोठा प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

औरंगाबाद : शहरासह जिल्ह्यात आंदोलन पेटल्याने सकाळपासून औरंगाबादेतील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तर आक्रमक झालेले आंदोलन रस्त्यावर असून शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बाजारपेठा बंद आहे. औरंगाबाद शहरातील प्रमुख बाजारपेठा सुद्धा बंदच आहे. 

कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्यापासून औरंगाबाद शहरातील मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. शहरातील क्रांती चौकात आंदोलनकर्त्यांचा ठिय्या सुरुच आहे. बंद दरम्यान सोशल मिडीयीवरुन मॅसेज जात असल्याने प्रशासनाने खबरदारी घेत इंटरनेट सेवा बंद केली आहे. सध्या जिल्ह्यातील तालुक्‍याच्या ठिकाणी आंदोलक रस्त्यावर असून त्यांनी शासनाची तीव्र शब्दात निषेध करत तहसिलदारांना निवेदन दिले आहे. ​

Web Title: MarathaKrantiMorcha Internet ban in Aurangabad