#MarathakRantiMorcha परळीतील मराठा आंदोलन 30 नोव्हेंबरपर्यंत स्थगित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

परळी (जि. बीड) - मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासनाच्या आश्‍वासनाचे पत्र मंगळवारी परळीच्या आंदोलकांना देताना अधिकारी.
बीड - मराठा समाजास आरक्षणासह विविध मागण्यांसाठी परळी येथे 21 दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी (ता. सात) न्यायालय आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर 30 नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आले. तत्पूर्वी आंदोलक व प्रशासनात चर्चा झाली.

समाजाला आरक्षण, मेगा भरती थांबवावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी द्यावा यांसह समाजाच्या विविध मागण्यांसाठी परळीत 18 जुलै रोजी पहिला मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. यानंतर सुरू झालेले ठिय्या आंदोलन 21 दिवसांपासून सुरू होते. दरम्यान, परळीतल्या आंदोलनामुळे राज्यात मराठा आरक्षण मागणी आंदोलनाचे दुसरे पर्व सुरू झाले. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीत न्यायालयाने आंदोलनाबाबत व्यक्त केलेल्या मतावरून मंगळवारी परळीतील आंदोलक आणि प्रशासनात चर्चा झाली. यानंतर शासन मराठा समाजाबाबत घेत असलेल्या निर्णयाचे पत्र प्रशासनातर्फे आंदोलकांना देण्यात आले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजाच्या मागण्यांबाबत प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्‍वासनांची पूर्तता 15 नोव्हेंबरपर्यंत केली नाही, तर पुन्हा याच ठिकाणी ठिय्या आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation