#MarathaKrantiMorcha नांदेड शहर व जिल्ह्यात कडकडीत बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

- नांदेड शहरात कडकडीत बंद, हजार एक जणांच्या जमावाने मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढून घोषणाबाजी केली व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दिले निवेदन. यावेळी जमावाने वाहने व दुकानांवर तसेच भाग्यनगर पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. सध्या शहरात तणावपूर्व वातावरण. 
- पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या गाड्या तरोडेकर चौक राज कॉर्नर येथे फोडल्या. 
- शिवसेना जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांना मारहाण, पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले. 
- नांदेड शहरातील शाळा, महाविद्यालये कडकडीत बंद 

- नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचा बंदला पाठिंबा, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना निवेदन देण्यात आले. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी वकील संघाच्या वतीने करण्यात आली. 
- नांदेड शहरातील खासदार अशोक चव्हाण, आमदार डी. पी. सावंत, अमर राजूरकर, हेमंत पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, राम पाटील रातोळीकर आदींच्या घरांना पोलिसांचे संरक्षण, त्यांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरीकेट लावले. 
- नांदेड - आरक्षणाच्या मागणीसाठी कायगाव टोका येथील गोदावरी नदीवरील पुलाजवळ सोमवारी (ता.२३) काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केली. त्यामुळे मराठा समाजात सरकार विरोधी संतापाची लाट पसरली असून जिल्हाभरात शिंदे यांना श्रद्धाजंली अर्पण करून आंदोलन करण्यात येत आहे. 
- कंधार - कंधारमध्ये बंदला हिंसक वळण, आमदार चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या पोलिंसावर दगडफेक. 
- उमरी, धर्माबाद - परिसरात बंदला प्रतिसाद, मराठा समाजाकडून शांततेत बंद पाळण्यात आला. 
- अर्धापूर - नागपूर महामार्गावर टायर-लाकडी खोड जाळून केला रास्ता रोको, महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प. 
मुखेड, देगलूर - परिसरातील मुक्रमाबाद- जांब गावात सरकारची अंत्ययात्रा काढून केला निषेध. 
- भोकर, बिलोली - व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवून दिला बंदला प्रतिसाद. 
- माहूर, किनवट'- किनवट'परिसरात रस्त्यावर झाडे तोडून टाकली - वाहतूक ठप्प, 
- माहूरला तेलंगणा परिवहनच्या बसवर दगडफेक, पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना अटक. 
- लोहा, नायगाव - परिसरात कडकडीत बंद - मराठा तरूणांनी रस्तायवर उतरून दिल्या सरकारविरोधी घोषणा.

Web Title: MarathaKrantiMorcha The Nanded city and the district are closed