मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात पुन्हा एक बळी    

अमोल जोगदंड
रविवार, 5 ऑगस्ट 2018

हा तरुण मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात मागील पंधरा दिवसांपासून सक्रिय होता. तो घरी नेहमी सांगायचा की मला काही तरी करायचंय यातच त्याने आज ता. 5 पहाटे च्या दरम्यान आपल्या घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली.

नांदेड - सावरगाव ता. अर्धापूर येथील गणपत बापूराव आबादार (वय 38) या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपल्या राहत्या घरावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. 5) सकाळी घडली.

हा तरुण मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात मागील पंधरा दिवसांपासून सक्रिय होता. तो घरी नेहमी सांगायचा की मला काही तरी करायचंय यातच त्याने आज ता. 5 पहाटे च्या दरम्यान आपल्या घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. सदरच्या घटनेने गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत गावाजवळील वसमत - अर्धापूर जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रं.222वर तीन तास रस्तारोको केला. यावेळी गावात तणावपूर्ण वातावरण असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सद्या वातावरण तणावपूर्ण असून घटनास्थळी जिल्हधिकारी जोपर्यंत येणार नाहीत तो पर्यंत पंचनामा होऊ देणार नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MarathaKrantiMorcha one young man commits suicide in nanded