#MarathaKrantiMorcha आंदोलनादरम्यान पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

शाम लक्ष्मण काटगावकर असे मृत पोलिसाचे नाव आहे. कायगाव पूलावर जाळपोळ करण्यात आली. त्यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरु केली. यादरम्यान आंदोलकाच्या मागे धावताना शाम काटगावकर यांना हृदयविकाराचा धक्का बसला.

औरंगाबाद : कायगाव टोका येथील पूलावर जाळपोळीदरम्यान झालेल्या पळापळीत उस्मानाबाद मुख्यालयाच्या एका पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 24) दूपारी एकच्या सूमारास घडली. 

शाम लक्ष्मण काटगावकर असे मृत पोलिसाचे नाव आहे. कायगाव पूलावर जाळपोळ करण्यात आली. त्यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरु केली. यादरम्यान आंदोलकाच्या मागे धावताना शाम काटगावकर यांना हृदयविकाराचा धक्का बसला. यानंतर त्यांना एका प्राथमिक रुग्णालयात दाखल करुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, येथील डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

Web Title: MarathaKrantiMorcha police dead on heart attack