#MarathaKrantiMorcha तेलंगणाच्या सीमावर्ती भागातही बंदला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

नांदेड - तेलंगणा व महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, बिलोली, देगलूर, भोकर उमरी, किनवट, हिमायतनगर या सीमावर्ती तालुक्यातही मराठा आंदोलनाला आज दुपारनंतर प्रतिसाद मिळाला..

उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत या भागात हिंसक घटना कमी असल्या तरी जिल्ह्यात आज या आंदोलनाला चांगला प्रतिसाद लाभला. सीमेवरील भोकर, उमरीत कडकडीत बंद ठेवण्यात आला. उमरीत शाळा महाविद्यालये बंद करण्यात आले.

किनवटमध्ये आजच्या आंदोलनात मराठा युवकांचा मोठा सहभाग होता. बंदला १००टक्के प्रतिसाद मिळाला. धर्माबादेत शहर बंदला व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Web Title: #MarathaKrantiMorcha response to band in Telangana border area