#MarathaKrantiMorcha पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसेनेचा रास्तारोको

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 25 जुलै 2018

सकल मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदमधील मंगळवारी (ता. 24) दुपारी तरोडेकर चौकात आंदोलकावर पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भूजंग पाटील यांना गुरासारखी मारहाण केली. सध्या ते रुग्णालयात असून पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ बुधवारी (ता. 25) सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत शिवाजीनगर उड्डाणपुलावर रास्तारोको केला. या रास्तारोको आंदोलनात शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सुभाष साबणे आणि जिल्हा प्रमुख बाबुराव पाटील, शहरप्रमुख दत्ता कोकाटे, पप्पु जाधव, डॉ. मनोज भंडारी, प्रकाश कौडगे, उमेश मुंढे, वत्सला पुयड यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नांदेड- सकल मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदमधील मंगळवारी (ता. 24) दुपारी तरोडेकर चौकात आंदोलकावर पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भूजंग पाटील यांना गुरासारखी मारहाण केली. सध्या ते रुग्णालयात असून पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ बुधवारी (ता. 25) सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत शिवाजीनगर उड्डाणपुलावर रास्तारोको केला. या रास्तारोको आंदोलनात शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सुभाष साबणे आणि जिल्हा प्रमुख बाबुराव पाटील, शहरप्रमुख दत्ता कोकाटे, पप्पु जाधव, डॉ. मनोज भंडारी, प्रकाश कौडगे, उमेश मुंढे, वत्सला पुयड यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकल मराठा आंदोलनाची धग नांदेड शहरात दुसऱ्या दिवशीही पहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासोर सरकारच्या विरोधात घोषणा देत छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाब काळे यांनी अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच जिल्हा प्रमुख भूजंग पाटील यांना पोलिसांनी केलेली मारहाण निषेधार्ह असून बुधवारी त्याच्या निषेधार्थ रास्तारोको केला. 

यावेळी आमदार हेमंत पाटील म्हणाले की, पोलिसांच्या या रझाकारीचा सामना करण्यासाठी शिवसैनिक तयार आहेत. शिवसैनिकाला डवचण्याचा प्रयत्न करु नये. जिल्हा प्रमुखावर झालेला लाठीमार हा निंदनीय असून सकल मराठा समाजासोबत शिवसेना असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले की, मराठा आंदोलनात फुट पाडण्याचा कुटील डाव शासन करीत असून पोलिसांच्या बळावर हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच सकल मराठा आदोलकांनी आमच्याच घरावर काढलेला मार्चा निंदनीय असल्याचे ते म्हणाले. आम्ही सर्वजण आपल्या सोबत असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

यानंतर बोलताना आमदार सुभाष साबणे यांनी म्हटले की, आमच्या जिल्हा प्रमुखावर केलेला हल्ला निषेधार्ह आहे. पोलिसांची दादागीरी शिवसेना खपवून घेणार नाही. मराठा समाजाला सामाजीक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण मिळाले पाहिजे. 

यावेळी तहसिलदार किरण अंबेकर यांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्यास विनंती केली. यानंतर जिल्हाधिकारी अरूण डोंगरे व विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ. सुहास वारके यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: MarathaKrantiMorcha shivsena protest against police