#MarathaKrantiMorcha परतुर तालुक्यात कडकडीत बंद

योगेश बरीडे
मंगळवार, 24 जुलै 2018

परतूर(जि. जालना) -  परतूर तालुक्यातील आष्टी, श्रीष्टी, सतोना व वाटूर सह शहरात मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेले बंदला कडकडीत बंद पळून प्रतिसाद मिळाला. 

परतूर(जि. जालना) -  परतूर तालुक्यातील आष्टी, श्रीष्टी, सतोना व वाटूर सह शहरात मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेले बंदला कडकडीत बंद पळून प्रतिसाद मिळाला. 

परतूर तालुक्यातील मुख्य बाजार पेठ असणाऱ्या गावाला संपूर्ण बाजर पेठ सकाळपासूनच बंद होती. वाटूर येथे आज बाजारचा दिवस होता. सकाळी मराठा क्रांती मोर्चा व व्यापारी यांच्यात बंद ठेवण्याच्या कारणावरून थोडी बाचाबाची झाली पण पोलिसांच्या मध्यस्थीने वाद निवळण्यात आला. मुख्य मार्गावर या वेळी रास्ता रोको करण्यात आला. आष्टी येथील बाजार पेठ पूर्ण पणे बंद ठेवण्यात आली यावेळी मराठा समाजाच्या युवकांनी सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करत निषेध व्यक्त केला. श्रीष्टी व परतूर येथे काल आंदोलना दरम्यान बुडून मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या दरम्यान परतूर बस आगाराच्या पूर्ण बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. परतूर शहरातील पूर्ण शाळा व महाविद्यालयात पूर्ण पणे बंद होती. शहर व तालुक्यात चोख पोलिस बंदोबस्त होता.

Web Title: MarathaKrantiMorcha strikes in Pertur taluka