#MarathaKrantiMorcha उमरगा - राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

#MarathaKrantiMorcha उमरगा - राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

उमरगा - मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीची तत्काळ दखल घ्यावी, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी  (ता. २४) सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजातील नागरिक एकत्रित आले. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घातल्यानंतर हातात भगवा पताका घेऊन घोषणा देत राष्ट्रीय महामार्गावर अकरा वाजता रास्ता रोको आंदोलनाला सुरवात केली. 

मराठा आरक्षणासाठी नदीमध्ये उडी घेऊन बलिदान दिलेल्या गंगाखेडच्या तरुण काकासाहेब शिंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. या संदर्भात प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणासाठी राज्यभरात लाखोच्या संख्येने मुक मोर्चे काढुन शासनाला मागण्यांचे जिल्हा, तालुकास्तरावरून निवेदने देण्यात आली. सध्या परळीसह राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन सुरू करण्यात आले, मात्र शासन व मुख्यमंत्र्यांनी समाजाच्या न्याय मागणीची दखल घेतली नाही. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, राज्यात होणाऱ्या महाभरतीसाठी अगोदर आरक्षण जाहीर करावे मगच भरती करावी, आत्महत्याग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत समावेश करून घेण्यात यावे, कोपर्डी प्रकरणातील फाशीस पात्र ठरलेल्या दोषींना तत्काळ फाशी देण्यात यावी, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या योजनेचा लाभ आर्थिकद्रृष्ट्या दुर्बल घटकांना तसेच सुशिक्षीत बेरोजगारांना तत्काळ मिळावा, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागु कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com