#MarathaKrantMorcha औरंगाबादमध्ये आज शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

औरंगाबाद - मराठा आंदोलनाची आक्रमकता पाहता शहरातील अनेक शाळांनी मंगळवारी (ता. 24) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी रात्रीच घेतला. ज्यांनी शाळा उघडल्या त्यांनी कार्यकर्त्यांच्या आवाहनानंतर शाळा सोडून दिल्या. 

औरंगाबादेतील छावणी परिसरात असलेल्या इंग्रजी शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्याचे कळवले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकाळीच शाळेची वाट धरली. शहरातील एकूण परिस्थिती पाहता छावणी भागातील शाळा सकाळी सोडून देण्यात आल्या. औरंगपुरा भागातील शाळांमध्ये कार्यकर्त्यांनी जाऊन आवाहन केल्यावर शाळांनी मुलांना घरी सोडून दिले. त्यामुळे सगळीच मुले शाळेत गेल्या पावली माघारी घरी परतली. आंदोलनाची धग पाहता अनेक शाळांनी आपल्या स्कुल बस बाहेर ना काढता पालकांनाही अगोदरच एसएमएस द्वारे कळवण्यात आले होते.

Web Title: #MarathaKrantMorcha Aurangabad, today schools are closed