कर्करोगाशी लढणाऱ्यां डॉक्टर आणि रुग्णांना सुखद धक्का 

कर्करोगाशी लढणाऱ्यां डॉक्टर आणि रुग्णांना सुखद धक्का 

औरंगाबाद : जागतिक होस्पाईस व पॅलिएटीव्ह केअर दिनानिमित्त अभिनेते संदीप पाठक, सुमित राघवण आणि चिन्मयी सुमित यांनी शासकीय कर्करोग रुग्णालयास भेट देऊन कर्करोग रुग्णांशी संवाद साधला.

पॅलिएटीव्ह केअर दिनानिमित्त कर्करोग रुग्णालयाच्या वतीने 'मायेची फुंकर' या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी दुपारी तीन वाजता करण्यात आले आहे. त्यापूर्वी या तिन्ही अभिनेत्यांनी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता कर्करोग रुग्णालयास भेट दिली. विशेष कार्य अधिकारी डॉ अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ संगीता पाटील, विभागप्रमुख डॉ बालाजी शेवाळकर, डॉ. वर्षा देशमुख, डॉ. ऋषिकेश खाडिलकर, डॉ अर्चना राठोड यांनी या अभिनेत्यांना रुग्णालयाच्या कामकाज कसे चालते याची माहिती दिली. 

अभिनेता संदीप पाठक आणि सुमित राघवन यांनी ओपीडी, जन आरोग्य योजनेची मदत आणि ओपीडितील कामकाज व रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा जाणून घेतल्या. अभिनेत्यांनी या रुग्णालयात येण्याची पहिलीच वेळ होती. दुर्धर आजाराशी लढणाऱ्या डॉक्टरांसह रुग्ण नातेवाईकांना या अभिनेत्यांच्या सहवासाने काहीसा सुखद अनुभव आला. तर अनेकांनी सेल्फीची हौस ही भागवली. सेलिब्रेटीनी येऊन आस्थेने केलेली विचारपूर कर्करोग रुग्णालयातील प्रत्येकासाठी सुखद धक्का होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com