या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHOTOS

विकास देशमुख
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

मध्यप्रदेशातील एका नदीकाठी त्यांचे समाधीस्‍थळ आहे. पण, अजूनही ते उपेक्षित आहे. नदीला पूर आला तर ही समाधी पाण्याखाली जाते. त्या ठिकाणी कुठल्याच सोयी-सुविधा नसल्याने पर्यकटकही अपवादाने या ठिकाणी जातात.

औरंगाबाद -  पानिपत चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धुमाकूळ घालत  आहे. या चित्रपटामुळे पेशव्यांच्या कर्तृत्वाला उजाळा मिळाला. पेशव्यांमध्ये थोरले बाजीराव पेशवे हे सर्वांत शूर होते. मध्यप्रदेशातील एका नदीकाठी त्यांचे समाधीस्‍थळ आहे. पण, अजूनही ते उपेक्षित आहे. नदीला पूर आला तर ही समाधी पाण्याखाली जाते. त्या ठिकाणी कुठल्याच सोयी-सुविधा नसल्याने पर्यकटकही अपवादाने या ठिकाणी जातात. परिणामी, पुरातत्त्व विभागाचे याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. यावर eSakal.com ने टाकलेला हा प्रकाशझोत. 

थोरले बाजीराव पेशवे यांना वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे (इ.स. 1720) यांचे पेशवे (मुख्य प्रधान) होण्याचा मान मिळाला. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावानेही ओळखले जाते. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट्ट हे बाजीरावांचे वडील.

वडिलांच्या सानिध्यात रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीराव यांनी आपल्या कुशल युद्ध नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. बाजीराव यांनी तब्बल 35 लढाय्या लढल्‍या आणि त्‍या सर्व जिंकल्‍या. 

Image may contain: outdoor

 

संबंधित बातमी : पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या...

 
उष्‍माघाताने झाला मृत्यू
27 फेब्रुवारी 1740 ला त्‍यांनी नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकली आणि मुंगीपैठण येथे तह केला. या तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण प्रांत बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी 30 मार्च 1740 लाा  बाजीराव खरगोणला गेले. रणरणत्‍या उन्‍हात घोडेस्‍वारी करताना रावेरखेडी या छोट्याशा गावाजवळ त्‍यांना उष्‍माघात झाला. त्यामुळे 28 एप्रिल 1770 ला त्‍यांनी मध्यप्रदेशातील खरगोण जिल्ह्यातील रावेरखेडी या गावात नर्मदेच्‍या तिरावर वयाच्‍या 40 व्‍या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. याच ठिकाणी शाहीइतमामात त्यांच्यावर अत्यंसस्कार करण्यात आले.

Image may contain: outdoor

पुढे ग्वाल्हेर संस्थानच्या सिंधिया घराण्याने या ठिकाणी वृंदावन स्वरूपातील एक समाधी बांधली. तिला चारही बाजूने तंटबंदी करण्यात आली. बाजीरावाच्या अस्थी या समाधीस्थळी असल्याचे सांगितले जाते.  मध्यप्रदेश सरकारने या समाधी स्थळासाठी आठ कोटी रुपयांची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र 27 लाख रुपयेच दिले. त्यातूनही अपेक्षित असे काम 
झालेले नाही.

Image may contain: outdoor

या महत्त्वाच्या लढायांच्या समावेश
थोरल्या बाजीरावांना एकूण 35 लढया जिंकल्या. त्यामुळे माळवा (डिसेंबर,1723), धार (1724), औरंगाबाद (1724), पालखेड (फेब्रुवारी 1728), अहमदाबाद (1731) उदयपूर (1736), फिरोजाबाद (1737), दिल्ली (1737), पेशावर (1737), कंदहार (1738), काबूल (1737), बलुचिस्तान (1737), तसेच भारतातील भोपाळ (1738), वसईची लढाई (17 मे 1739) यासह इतर लढायांचा समावेश आहे. 

जाणून घ्या : इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते? 
 
पाण्याने वेढते समाधी स्थळ
मध्यप्रदेशातील खरगोण जिल्ह्यातील रावेरखेडी या गावात नर्मदेच्‍या तिरावर थोरले बाजीराव यांची समाधी आहे. या ठिकाणाची सद्यस्थितीत मोठी दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात नर्मदेला येणाऱ्या पुरामुळे ही समाधी पाण्याखाली जाते. एवढेच नाही तर समाधी स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. मात्र, याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथे पर्यटकही अपवादानेच जातात. इंदूरची श्री बाजीराव पेशवा (प्रथम) स्मृती प्रतिष्ठान; ही संस्था पुण्यातील काही मान्यवरांच्या साथीने बाजीराव समाधीच्या जतनाच्या मुद्दय़ावर काम करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Information about First BajiRao Peshwa Tomb