#मृत्यूदंड : कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला, जाणून घ्या...

विकास देशमुख
Tuesday, 7 January 2020

फासाचा दोर कसा तयार होतो, तो तयार करण्याची प्रक्रिया काय आहे, त्याची किमत काय आहे, कायद्याच्या भाषेत त्याला काय म्हणतात याची खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी.  

औरंगाबाद - निर्भयाप्रकरणातील आरोपींना मृत्यूदंड देण्याची तयारी सुरू झाली आहे. 22 जानेवारीला या नराधमांना फासावर लटकवले जाऊ शकते. पण, फासाचा हा दोर देशातील केवळ बक्सर (बिहार) येथील कारागृहातच तयार केला जातो. या करागृहाला 10 दोरखंड तयार करण्याची ऑर्डर डिसेंबरमध्येच मिळाली होती. दोरही तयार झाले. हा कसा तयार होतो, तो तयार करण्याची प्रक्रिया काय आहे, त्याची किमत काय आहे, कायद्याच्या भाषेत त्याला काय म्हणतात याची खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी.  

अशी आहे प्रक्रिया
फाशी देण्यासाठी एक विशेष दोर असतो. त्याला मनिला असे म्हणतात. साबण आणि केळी लावून चार दिवस या दोराला मेनात घोळून नरम केले जाते. या दोरामुळे कैद्याला त्रास होत नाही. मनिला दोर करण्यासाठी काही विशेष प्रक्रिया केली जाते. सुरवातीला कच्च्या सुतापासून एक-एक 18 धागे तयार केले जातात. एका दोरखंडाला तब्बल 7,200 धागे लागतात. एता दोरखंडावर 5 ते 6 लोकांना काम करावे लागते. या कामासाठी कैद्यांनाच जबाबदारी दिली जाते. दोरखंड तयार करण्यासाठी हातासह थोडाफार मशीनचाही वापर होतो. 

अरे बाप रे -  प्रेमविवाहानंतरही पत्नीचे तुकडे-तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये, तिच्यासाठी धर्मही बदलला होता  

No photo description available.
मनिला दोर

हा दोर का आहे खास?
सध्या बस्तर कारागृहात असे दहा दोर तयार करण्याची तयारी सुरू झाली असून, ते निर्भयाप्रकरणातील आरोपींसाठीच आहेत, असे सांगितले जात आहे. हा दोर इंग्रज काळापासून देशामध्ये केवळ बिहारच्या बक्सर कारागृहातच तयार होतो. भारतात कोणत्याही कारागृहात फाशी द्यायची असेल तर याच ठिकाणहून दोर पाठवला जातो. ज्यावेळी ब्रिटीश भारतात ज्यावेळी बस्तरमध्ये दोर तयार होत नव्हता तेव्हा फिलिपींसची राजधानी मनिला येथून हा दोर आयात केला जात होता. मनिला शहरावरून त्याचे मनिला असे नाव पडले. ब्रिटिशांनी बिहारमधील बस्तरमध्ये त्याची निर्मिती सुरू केली. 168 किलो वजत पेलण्याची त्याची क्षमता असते. इंग्रज काळापासूनच त्याची किमत केवळ 182 रुपये आहे. स्वतंत्र भारतात त्यात कुठलही वाढ करण्यात आली नाही.

Image may contain: outdoor

जाणून घ्या - पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? 
 
एकाने केली आत्महत्या
सात वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 2012 ला निर्भयासोबत दिल्लीत चालत्या बसमध्ये सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. दोषी ठरविण्यात आलेल्या सहा अल्पवयीन मुलांपैकी एकाला आता सोडून देण्यात आले. त्याचवेळी तिहाडमध्येच या प्रकरणातील आरोपी रामसिंग याने आत्महत्या केली. उर्वरित चार दोषींना लवकरच फाशी देण्यात येणार आहे. 

हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...
 

अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

जाणून घ्या मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi information About Hanging Ropes