सरकारची मस्ती उतरविण्यासाठी निट बटणे दाबा - अजित पवार

वैजिनाथ जाधव
गुरुवार, 18 जानेवारी 2018

गेवराई (जि. बीड) - सरकार मस्तीत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊले ठेवून मुख्यमंत्री काम करत आहेत. त्यांनी जसा नोटाबंदीचा निर्णय घेतला तसा यांनी शाळाबंद करत आहेत. सरकारची मस्ती उतरविण्यासाठी आगामी निवडणुकांत निट बटणे दाबा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळातील नेते अजित पवार यांनी केले. हल्लाबोल यात्रेतील जिल्ह्यातील तिसरी सभा गुरुवारी (ता. १८) गेवराई येथे झाली. या सभेत पवारांनी हे उद्गार काढलेत. 

श्री. पवार म्हणाले, 'या शासनाच्या निर्णयांची लोकांना उब आली आहे. या सरकारला सामान्य, शेतकरी, व्यापाऱ्यांबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा राहीलेला नाही. या सरकारची किव करावी वाटते. दिवंगत नेते यशवंतराव चव्हाणांनी जेष्ठ नेते शरद पवारांना बेरजेचे राजकारण शिकवले. तेच राजकारण आपण पुढे नेत आहोत.' पुढच्या काळात जेष्ठांचा अनुभव आणि नव्यांना सोबत घेऊन राजकारण करायचे असल्याचेही अजित पवार म्हणाले. अमरसिंह पंडित यांनी मोठ्या प्रयत्नाने जयभवानी सहकारी साखर कारखाना सुरु केला. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटला आहे. यावेळी धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, आमदार अमरसिंह पंडित, नवाब मलिक, जयसिंह सोळंके, महेबुब शेख यांचीही भाषणे झाली. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विद्या चव्हाण, चित्रा वाघ, संग्राम कोते पाटील, सुरेखा ठाकरे, सोनल देशमुख, राजेंद्र जगताप, बजरंग सोनवणे, रेखा फड उपस्थित होते. प्रास्ताविक संयोजक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. तत्पुर्वी युवकांची दुचाकी फेरी निघाली. सभेला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. 

Web Title: marathi news Ajit pawar NCP against BJP politics