चार्ली पोलिसाने घेतले जाळून 

योगेश पायघन
सोमवार, 12 मार्च 2018

पंचविस वर्षीय चार्ली पोलिसाने जाळून घेतल्याची घटना घडली आहे. 

औरंगाबाद - मयुरपार्क परिसरातील पार्वती हाऊसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या पंचविस वर्षीय चार्ली पोलिसाने जाळून घेतल्याची घटना सोमवारी (ता. 12) साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. अनिल घुले (वय 25) या तरुण चार्ली पोलिसाचे नाव आहे. 

प्रत्यक्षदर्शी सतिष सुधारकर दौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी पार्वती अपार्टमेंट परिसरात नित्य नियमाने गेले होते. त्यावेळी अनिल घुले हे पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर पडले. आरडाओरड झाल्याने परिसरातील नागरीक जमले. नागरिकांनी ब्लँकेट टाकून अनिलला आगलेली आग विझवली. भाजलेला अनिल 'मी चार्ली पोलिस आहे. माझ्या मित्रांना लवकर बोलवा' अशी विणवणी करत होता. नागरीकांनी 108 ची रुग्णवाहीका उपलब्ध न झाल्याने खाजगी वाहन चालकाच्या विनवण्या करत अनिल घुले यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी 100 टक्के भाजले असल्याचे पोलिसांना कळवले आहे. सध्या घाटीत अनिलवर उपचार सुरु आहेत. अनिल घुले यांच्या सोबत त्यांची आई राहते. तर येत्या 21 मार्चला अनिलचे लग्नं होते, अशी माहिती परिसरातील नागरीकांनी दिली.  

100, 108 ची पोलिसालाही मिळाली नाही मदत 
अनिल घुले हे चार्ली पोलिस आहेत. त्यांना मदतीसाठी नागरीकांनी तासभर 108 रुग्णावाहीका व 100 नंबरवर कॉल केले. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी दौड यांनी दिली. त्यांनी सात ते आठ वेळ 100 नंबर डायल केला. शिवाय 108 च्या रुग्णवाहीकेला कॉल केला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दुर्घटनेत पोलिसालाही शासकीय मदत उपलब्ध होऊ न शकल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Web Title: marathi news aurangabad charlie police fire

टॅग्स