औरंगाबादचे पोलिस आयुक्त सक्तीच्या रजेवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

औरंगाबादच्या पोलिस आयुक्त यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. हि घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

औरंगाबाद - कचरा प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या आंदोलक गावकाऱ्यांना झालेली मारहाण औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांच्या चांगलीच अंगलट आली. त्यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. हि घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. अशी माहिती आमदार इम्तियाज जलील यांनी 'सकाळ' दिली.

औरंगाबादेतील मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या आंदोलकांवर सात मार्चला लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर गावात घराघरात जाऊन महिला, मुलांना पोलिसांनी मारहाण केली होती. सुमारे 40 पेक्षा जास्त वाहन, घरगुती साहित्य व सीसीटीव्ही कॅमेरे तोडून पोलिसांनी गावात दगडफेक केल्याचा आरोप आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. कचराकोंडी आणि मिटमिटावासीयांना मारहाण या प्रश्नावर विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. दरम्यान कचराकोंडीवरून विरोधकांनी विधानसभेत गदारोळ घातला. विरोधकांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांन सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. तसेच एक महिन्याच्या आत महासंचालक स्तरावर समिती नेमण्यात येईल, यात औरंगाबादेत घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचेही सांगण्यात आले आहे. आयुक्त यादव यांच्या जागी प्रभारी म्हणून विशेष महानिरीक्षक मिलिंद भारंबे पदभार घेतील असेही आमदार इम्तियाज जलील यांनी 'सकाळ' ला सांगितले.

Web Title: marathi news aurangabad commissioner of police yashasvi yadav