महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची तडकाफडकी बदली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

नारेगाव परिसरातील ग्रामस्थांनी 16 फेब्रुवारीपासून कचरा डेपोच्या विरोधात आंदोलन सुरू केल्यापासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यात मुगळीकर यांना अपयश आले होते.

औरंगाबाद - शहराची कचराकोंडी फोडण्यात अपयशी ठरलेले महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची शुक्रवारी (ता. 16) तडकफडकी बदली करण्यात आली. कचऱ्याचा हा दुसरा बळी असून, गुरूवारी (ता. 15) पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. नारेगाव परिसरातील ग्रामस्थांनी 16 फेब्रुवारीपासून कचरा डेपोच्या विरोधात आंदोलन सुरू केल्यापासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यात मुगळीकर यांना अपयश आले होते. विधीमंडळात कचऱ्याच्या विषयावरून जोरदार हंगामा झाला होता. दरम्यान मिटमिटा भागात नागरिकांवर अमानुष लाठीमार केल्याप्रकरणी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यामळे महापालिका आयुक्तांवर देखील कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात होती. शुक्रवारी सकाळीच त्यांच्या बदलीचे आदेश महापालिकेत धडकले. वैधानिक विकास महामंडळाच्या संचालक पदावर त्यांची वर्णी लागली आहे. केवळ 11 महिण्यात त्यांची बदली झाली आहे. मुगळीकर यांचा पदभार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना देण्यात आला आहे.

Web Title: marathi news aurangabad garbage problem garbage depot corporation