औरंगाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे पाच हजार प्रकरणात तडजोड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे 2017 सालामध्ये आयोजित पाच राष्ट्रीय लोकअदालतींमध्ये प्रलंबित प्रकरणांपैकी एकुण 40 हजार 855 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी दोन हजार 728 प्रकरणांमध्ये तडजोड झाली. तर दाखलपुर्व 57 हजार 58 पैकी दोन हजार 559 प्रकरणांमध्ये अशी एकुण पाच हजार 287 प्रकरणांमध्ये तडजोड झाली, असे येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. डी. इंदलकर यांनी कळविले. 

तडजोड झालेल्या प्रकरणांमध्ये कौटुंबिक स्वरुपाची 183 प्रकरणे आहेत. तर भुसंपादनाची 46, नुकसान भरपाईची 226, धनादेश अनादरीत झाल्याची एक हजार 485, तडजोड योग्य फौजदारी 574 प्रकरणे आणि तडजोड योग्य दिवाणी 214 प्रकरणांमध्ये तडजोड झाली. 
ही प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरीता जिल्ह्यातील न्यायाधीश, तज्ज्ञ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या मंडळाने (पॅनलने) सहकार्य केले. त्यामुळे जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये तडजोड झाली.

दहा फेब्रुवारीला होणार राष्ट्रीय लोकअदालत 
10 फेब्रुवारी ला उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये पुढील राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले असल्याचेही कळविण्यात आले आहे. 

Web Title: marathi news aurangabad Legal Services Authority