म्हैसमाळ, जयदेववाडी यात्रेसाठी एसटीच्या जादा गाड्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

औरंगाबाद - म्हैसमाळ गिरिजादेवी यात्रेला जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने जादा बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील सर्व आगारांतून यात्रेसाठी एसटी गाड्या सोडण्यात येणार आहेत. 

औरंगाबाद - म्हैसमाळ गिरिजादेवी यात्रेला जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने जादा बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील सर्व आगारांतून यात्रेसाठी एसटी गाड्या सोडण्यात येणार आहेत. 

म्हैसमाळ यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून सोमवारपासूनच (ता. २९) यात्रा स्पेशल बसगाड्या सोडल्या जात असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार यांनी दिली. म्हैसमाळ येथील गिरिजादेवी यात्रेला सोमवारपासून सुरवात झाली आहे. येत्या चार फेब्रुवारीपर्यंत ही यात्रा चालणार आहे. भाविकांच्या सेवेसाठी औरंगाबाद ते म्हैसमाळ मध्यवर्ती बसस्थानकातून तब्बल २२ बसेस, तर फुलंब्री ते म्हैसमाळ पाच, लासूर ते म्हैसमाळ एक बस अशा २८ बसगाड्या सोडल्या जाणार आहेत.

त्याचप्रमाणे जयदेववाडी यात्रेसाठी सिल्लोड आगारातून पंधरा तर सोयगाव आगारातून पाच बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. देवगाव रंगारी येथून म्हैसमाळसाठी वैजापूर डेपोतून भाविकांची गर्दी लक्षात घेऊन आवश्‍यकतेनुसार बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. कन्नड येथून म्हैसमाळसाठी सात बसेस सोडल्या जाणार आहेत. म्हैसमाळ यात्रेसाठी ३० जानेवारी रोजी विविध आगारातून बारा बसेस, ३१ जानेवारी रोजी ५३ बसेस आणि १ फेब्रुवारी रोजी वीस बसेस तर दोन फेब्रुवारी रोजी चार यात्रा बसेस सोडल्या जाणार आहेत.

Web Title: marathi news aurangabad marathwada news mhaismal jaidevwadi yatra st