वाहतूक पोलिसांनी वाचवले दोन मद्यधुंद मुलींचे प्राण

अनिलकुमार जमधडे
शुक्रवार, 2 मार्च 2018

औरंगाबाद : दोन मद्यधुंद तरूणींना एका विहरीजवळ फेकून दुचाकीस्वार दोघांनी पोलिसांना बघून पलायन केले. ही घटना शुक्रवारी (ता. दोन) पाडेगाव जवळ घडली. 

छावणी शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे आणि त्यांचे सहकारी एक वाजेचा दरम्यान पेट्रेॉलिंग करीत दौलताबाद रोड जात होते. त्यांना मोटारसायकलस्वार सुसाट जाताना दिसली. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी मोटारसायकल स्वाराचा पाठलाग केला.

पडेगाव जवळ मेंढी- शेळी पालन केंद्राजवळ त्या मोटारसायकलस्वारांनी दोन्ही मुलींना विहिरीजवळ ढकलून दिले व पळ काढला.

दरम्यान घटनास्थळी ग्रामस्थ गोळा झाले. दोन्ही मुली मद्यधुंद होत्या, त्यांना बोलताही येत नव्हते. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक रोडगे, त्यांच्या सोबत असलेले पोलिस कर्मचारी अनिल राठोड, सद्दामो म्हसके, जाधव, गणेश गायकवाड, विशेष पोलिस अधिकारी मुसा खान यांनी तत्परता दाखवली. त्या मुलींचे जीव वाचले अन्यथा त्याना विहरीत ढकलून देण्याचा बेत होता का, याची माहिती घेण्यात येत आहे. अधिक तपासासाठी हे प्रकरण छावणी पोलिसांकडे देण्यात आले आहे.

Web Title: marathi news Aurangabad News Aurangabad Police