बनारस हिंदू विद्यापीठाची कुलगुरू निवड प्रक्रिया सुरूच 

अतुल पाटील
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

मला अद्याप पत्र मिळाले नाही. राष्ट्रपतींनी संधी दिली तर, निश्‍चितच स्विकारली जाईल. कुलगुरु कार्यालयातून दुपारी साडेबारा वाजता वाराणसीतील बनारस हिंदु विद्यापीठात फोन करण्यात आला होता. माझे तेथील कुलसचिव तथा प्रभारी कुलगुरु डॉ. निरज त्रिपाठी यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी अद्याप फॅक्‍स मिळाला नसल्याचे सांगितले तसेच समजल्यानंतर लगेच कळवतो, असे सांगितले. 
- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

नवी दिल्ली/औरंगाबाद : बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया अद्याप पुर्ण झाली नसल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे शुक्रवारी (ता. दोन) स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू प्रोफेसर बी. ए. चोपडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा दिवसभर शैक्षणिक वर्तुळात सुरू होती. डॉ. चोपडे यांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. 

तत्पुर्वी, "बीएचयू'तील सुत्रांनी डॉ. चोपडे यांची नियुक्ती झाल्याचा दावा केला होता. मुलींच्या छेडछाडीच्या वाढत्या घटनानंतर गेल्या वर्षीपासून "बीएचयू'तील कुलगुरूपद रिक्त आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयातील प्रवक्‍त्याने सांगितले, ""बीएचयूतील कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया अजून सुरूच आहे. यासाठी निवड समिती नियुक्त केली आहे. ही समिती आपली शिफारस राष्ट्रपतींना करेल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निगराणीखाली ही समिती काम करते.'' 

बीएसयुमध्ये मुलींच्या छेडछाडीनंतर सप्टेंबर 2017 मध्ये गिरीषचंद्र त्रिपाठी यांना दोन महिन्यांच्या सक्‍तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. नोव्हेंबर 2017 पासून कुलगुरुपदाचा अतिरिक्‍त कार्यभार कुलसचिव निरज त्रिपाठी यांच्यावर सोपवला आहे. त्यानंतरही प्रक्रिया सुरुच आहे. 

मला अद्याप पत्र मिळाले नाही. राष्ट्रपतींनी संधी दिली तर, निश्‍चितच स्विकारली जाईल. कुलगुरु कार्यालयातून दुपारी साडेबारा वाजता वाराणसीतील बनारस हिंदु विद्यापीठात फोन करण्यात आला होता. माझे तेथील कुलसचिव तथा प्रभारी कुलगुरु डॉ. निरज त्रिपाठी यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी अद्याप फॅक्‍स मिळाला नसल्याचे सांगितले तसेच समजल्यानंतर लगेच कळवतो, असे सांगितले. 
- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. 

कुलगुरु मुंबईला रवाना 
कुलगुरु शुक्रवारी (ता. 2) मुंबईला रवाना झाले आहेत. त्यापुर्वी मुंबईतील भेटीबद्दल विचारले असता, स्पष्ट बोलण्यास नकार देत त्यांनी स्मितहास्य केले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगुरु डॉ. चोपडे हे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना भेटणार आहेत. 

Web Title: Marathi news Aurangabad news Banaras Hindu University dr BA Chopde