Devidas-Tuljapurkar
Devidas-Tuljapurkar

देशातील बॅंकांचे थकीत कर्ज दहा लाख कोटींच्या घरात!

औरंगाबाद - पंजाब नॅशनल बॅंकेतील ११ हजार ४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणानंतर देशातील बॅंकांनी सावधगिरीची भूमिका घेतला आहे. देशभरात एनपीए (नॉन परफॉर्मिंग ॲसेट) असणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहेत. देशातील २०१७ पर्यंत साडेसहा लाख कोटी रुपयांचा ‘एनपीए’ होता, आता तो दहा लाख कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. कर्ज घेणाऱ्यांत डायमंड, पॉवर सेक्‍टर, कोळसा खाणचालक आघाडीवर असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज फेडरेशनचे सचिव देविदास तुळजापूरकर यांनी दिली.

नीरव मोदी यांनी केलेल्या पीएनबी बॅंक घोटाळ्यामुळे थकीत कर्जप्रकरणी सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. कर्ज घेणाऱ्यामध्ये डायमंड, ऊर्जा व कोळसा खाण क्षेत्रे अग्रस्थानी आहेत. देशभरात २०१० नंतर थकीत कर्जदारांची संख्या झपाट्याने वाढली आहेत. २००९-१० मध्ये ५९ हजार ९२६ कोटींचा ‘एनपीए’ होता, तो सात वर्षांत सहा लाख कोटींच्या घरात गेला आहे. २०१६-१७ मध्ये ६ लाख ८४ हजार ७३३ कोटींपर्यंत पोहोचला आहे. यानंतरच्या उर्वरित काळात त्यात आणखी भर पडली आहे. नेहमीच कृषी क्षेत्रात कर्ज बुडीत असल्याचा आरोप करण्यात येतो.

मात्र कृषी क्षेत्रात केवळ ८.३ टक्‍के कर्जे आतापर्यंत वाटप झाली आहेत. त्या तुलनेत मायक्रो व स्मॉल इंटरप्रायजेसला ११.३ टक्‍के कर्जे वाटप झाली आहेत. सतत वाढत जाणारा एमपीए हा बॅंकांसाठी धोकादायक ठरत आहेत. बॅंकांतर्फे मोठ्या हिऱ्यांना कर्ज देण्यात येत असल्याने ‘एनपीए’त वाढ होत असल्याचेही श्री. तुळजापूरकर यांनी सांगितले.

बारा कंपन्या मोठ्या थकबाकीदार
नीरव मोदीनंतर मोठे कर्जाच्या थकबाकीदारांची माहिती हळूहळू समोर येत आहे. देशभरातील बारा टॉप मोस्ट थकबाकीदारांची यादी विविध बॅंकांतर्फे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पॉवर, स्टील, इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपन्यांचा समावेश आहे. प्रत्येक कंपनीने जवळपास ५ हजार कोटींपासून ४४ हजार कोटी रुपयांपर्यंत कर्जे थकविली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com