औरंगाबादेतील रस्ते सामसूम; बंदचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

विद्यापीठ बंद
- कुलगुरूंच्या बंगल्याजवळ बॅरिकेट लावून रस्ता बंद करण्यात आला आहे
- सद्यस्थितीत औरंगाबाद येथील बाजारपेठा पूर्ण बंद आहेत
- आंबेडकरनगर येथे  200 ते 250 महिलांचा मोब रस्त्यावर
- पोलिस आणि महिला आमने सामने

औरंगाबाद : भिमा कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदमूळे औरंगाबादेत सर्व दुकाने, प्रतिष्ठान, बाजारपेठा व बंद झाल्या असून सकाळ पासून सर्व रस्ते सामसूम झाले होते.

केवळ दूचाकी व रिक्षा सुरु असून रस्त्यावर तरुण बंदचे आवाहन करीत फिरत आहेत. परंतू काही ठिकाणी जबरदस्ती दूकाने बंद करण्याचे प्रकार घडले आहेत. शासकीय रुग्णालय घाटीत रुग्णसेवा सुरळित सुरू असून (सोमवार ता 1) संध्याकाळपासून उपचार केलेल्या जखमींची संख्या 72 वर पोहचली आहे  यातील 7 जण दाखल असून इतर जखमींना उपचार करून घरी रवाना करण्यात आले आहे

जालना रस्त्यावर वर्दळ तुरळक असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. रामनगर येथे मेडीकल दूकान उघडी पाहून तरुणांनी दगड भिरकावल्याचा प्रकार साडेदहाच्या सुमारास घडला. तत्पुर्वी मंगळवारी रात्री उस्मानपूरा भागात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून तरुणांची धरपकड केली. तसेच त्यांना येथेच्छ प्रसाद दिल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.

विद्यापीठ बंद
- कुलगुरूंच्या बंगल्याजवळ बॅरिकेट लावून रस्ता बंद करण्यात आला आहे
- सद्यस्थितीत औरंगाबाद येथील बाजारपेठा पूर्ण बंद आहेत
- आंबेडकरनगर येथे  200 ते 250 महिलांचा मोब रस्त्यावर
- पोलिस आणि महिला आमने सामने

Web Title: Marathi news Aurangabad news Bhima Koregaon effect