वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - अनोळखी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी (ता. २४) मध्यरात्री चिकलठाणा बाजारपट्टीलगत पुलावर घडली. सुनील मोहन भारती (वय ३८, रा. सावित्रीनागर, चिकलठाणा) असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, भारती हे चिकलठाणा येथील एका कंपनीतून काम आटोपून दुचाकीने घरी जात होते. बाजारपट्टीलगत पुलावरून जाताना मागून एक वाहन भरधाव वेगाने आले. त्या वाहनाने भारती यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जोरात होती, की भारती हे दुचाकीवरून उडून रस्त्याच्या मधोमध पडले. 

यानंतर त्यांच्या डोक्‍यावरून वाहनाचे चाक गेले. चिरडल्यानंतर  मदतीसाठी थांबण्याऐवजी वाहनचालक काही एक न बघता सरळ पसार झाला. अपघात घडल्याची बाब दिसल्यानंतर एका दुचाकीस्वाराने गस्तीवर असलेले पोलिस नाईक गणपत बायस यांना माहिती दिली. बायस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच अपघातस्थळी धाव घेत भारती यांना घाटीत नेले. भारती मृत असल्याने त्यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक केदारे यांनी दिली. या अपघाताची नोंद सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली.

आधार हरवला 
भारती हे एका मद्य कंपनीत कामगार होते. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी दोन मुलं असून, मुलगी बारावीला आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने भारती कुटुंबीयांचा आधारवड कोसळला. सुनील यांच्या मृत्यूची वार्ता ऐकून सावित्रीनगरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: marathi news aurangabad news bike accident