भाजप आमदाराविरोधात 'राष्ट्रवादी'ची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल मोर्चात भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यकत्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी बंब यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. दरम्यान, कार्यालयावर फुले उधळून गांधीगिरीने निषेध केला.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचा शनिवारी (ता. ) समारोप झाला. या वेळी पावर यांचे भाषण सुरू असताना काहींनी गोंधळ घातला. हे लोक आमदार बंब यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे करण्यात आला. गंगापूर येथील कारखान्याचा विषय निघाल्यानंतर या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता.

Web Title: marathi news aurangabad news bjp mla ncp agitation