शहर बस, ई-रिक्षांच्या खरेदीचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ५० शहर बस, २५ ई-रिक्षा, दहा हजार डस्टबिन खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एक फेब्रुवारीला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीचे मिनीटस्‌ स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा राज्याच्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी मंजूर केले आहेत. त्यानुसार येत्या दोन महिन्यांत खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी (ता.२६) सांगितले.  

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक सुनील पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक फेब्रुवारीला घेण्यात आली होती. या वेळी ५० शहर बस, २५ ई-रिक्षा, दहा हजार मोठ्या आकाराचे डस्टबिन, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर बैठकीचे मिनीटस्‌ अंतिम करण्यासाठी ते श्री. पोरवाल यांच्याकडे पाठविले होते. त्यांनी शहर बस, डस्टबिन, ई-रिक्षा खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. ही खरेदी शासनाच्या ऑनलाइन वेबपोर्टलवरील कंत्राटदारांकडून करण्यात येणार असल्याचे श्री. घोडेले यांनी सांगितले. 
एलईडीचा प्रस्ताव पुढील बैठकीत महापालिकेचा सध्या सुरू असलेला १२० कोटी रुपयांचा एलईडीचा प्रकल्प स्मार्ट सिटीतून करण्यास पोरवाल यांनी नकार दिला होता; मात्र स्मार्ट सिटीतून एलईडीचा वेगळा प्रकल्प राबविण्यास त्यांनी संमती दिली होती. त्यानुसार पुढील बैठकीपर्यंत शहरातील इतर भागांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटी योजनेत केंद्र व राज्य शासनाचा २९३.१५ कोटींचा निधी महापालिकेला प्राप्त आहे. हा निधी येस बॅंकेत ठेवण्यात आला आहे; मात्र तो राष्ट्रीयीकृत बॅंकेत ठेवण्याचा प्रस्तावदेखील बैठकीत विचारधीन होता. तीन जणांच्या समितीने महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेची शिफारस केली होती.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सहा मशीन   
घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातदेखील बैठकीत चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार नारेगाव येथे साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे व दोन प्रभागांसाठी एक या प्रमाणात मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुमारे १४ कोटी रुपयांच्या सहा मशीन खरेदी करण्याचा मार्गदेखील मोकळा झाला आहे. 

Web Title: marathi news aurangabad news city bus erickshaw purchasing smart city