महापौरांना स्वत:च्या वॉर्डातच कचरा टाकण्यापासून रोखले

योगेश पायघन
शनिवार, 3 मार्च 2018

औरंगाबाद - शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यास सलग सतराव्या दिवशीही महापालिका अपयशी ठरली आहे. शहरालगतच्या परिसरात कुणीच कचरा टाकू देत नसल्याने महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्वत:च्या वॉर्ड परिसरातील मोकळ्या जागेत कचरा टाकण्याचा प्रयत्न शनिवारी (ता. तीन) केला. मात्र, नागरिकांनी तो दुसऱ्यांदा हाणून पाडला. विशेष म्हणजे नागरिकांनी कचरा घेऊन जाणाऱ्या एका वाहनाची काच फोडली तर दुसऱ्या एका वाहनाला पेटविण्याचा प्रयत्न झाला. यामुळे महापौरांसह महापालिका प्रशासन अपयशाचे धनी ठरले आहेत.

 ईटखेडा परिसरातील मलनिःसारण प्रकल्पा शेजारील 15 एकर खुल्या जागेवर कचरा टाकायला ईटखेडा कांचनवाडी परिसरातील नागरीकांनी शनिवारी तीव्र विरोध केला. कचरा घेऊन कांचनवाडीच्या दिशेने जाणारी वाहने सकाळी महानुभाव आश्रमासमोर अडविण्यात आली. आंदोलक आक्रमक झाल्याने एका वाहनाची काच फोडण्यात आली. त्यानंतर कचरा भरलेल्या महापालीकेच्या एका ट्रकला पेटवण्याचा प्रयत्नही झाला. महापौर घोडेले यांच्या प्रत्येक शब्दाला ईटखेडा वॉर्डात मान आहे. तरी विरोध झाल्यामुळे 20 ते 25 वाहने रस्त्यावरच उभी करण्याची नामुस्की त्यांच्यासह महापालीका प्रशासनावर आली आहे. 

कांचनवाडीत कचरा टाकण्यास निघालेली वाहने अडवुन तिव्र विरोध दर्शवत आंदोलकांनी महानुभाव आश्रम येथे रस्ता रोखून धरला. शनिवारी सकाळी दहापासून वाहने अडवण्यात आली. महापालीकेच्या एका वाहनाची आंदोलकांनी काच फोडली तर एका ट्रकमधील कचरा पेटवुन दिला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे तातडीने आग आटोक्‍यात आली. चालक जगदीश गायकवाड, संजय जाधव, आनंद म्हस्के, विशाल ढाले, जाकेर पठाण, शोएब खान, रमेश भुईगळ यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

शहराची कचराकोंडी फोडण्यासाठी ईटखेडा कांचनवाडीच्या आंदोलकांशी गुरुवारी (ता. एक) महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी केलेली शिष्टाई निष्फळ ठरली होती. त्यानंतर बळाचा वापर झाल्याने सात ते आठ वाहनांचे नुकसान झाले होते. त्यामुळे आता पुन्हा आमच्याशी खेटणे महापालिकेला परवडणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

Web Title: marathi news aurangabad news corporation garbage problem