संसदेच्या कामकाजात विरोधी पक्षाकडून मुद्दाम गोंधळ ! 

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 12 एप्रिल 2018

औरंगाबाद - अर्थसंकल्प या महत्त्वाच्या विषयावर अधिवेशन सुरू असताना 23 दिवस कॉंग्रेस व त्यांच्या अन्य मित्र पक्षाने संसदेच्या कामकाजात मुद्दाम गोंधळ घातल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे केला. या काळात कामकाज होऊ शकले नाही. म्हणून भाजपचे सर्व खासदार 23 दिवसांचे मानधन परत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

संसदेत लोकसभेचे अधिवेशन चालू न दिल्याच्या निषेधार्थ श्री. दानवे यांच्या नेतृत्वाखाली येथील गुलमंडीवर गुरुवारी (ता. 12) एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी श्री. दानवे बोलत होते. ते म्हणाले, ""सभागृहात ज्या मागण्या होत्या. चर्चेचे विषय होते. त्या चर्चेला आम्ही तयार आहोत. असे सरकारतर्फे व पक्षातर्फेही सांगण्यात आल्यानंतररही 23 दिवस सतत कामकाज बंद पाडण्यात आले. त्यामुळे संसदेचा वेळ वाया गेला आणि जनतेचा पैसाही वाया गेला.

याचा निषेध म्हणून हा विषय थेट जनतेच्या दरबारात ठेवण्यासाठी प्रत्येक मतदार संघात गुरुवारी (ता. बारा) एक दिवस लाक्षणिक उपोषण सुरू आहे. 
लोकसभा हे सर्वाच्च सभागृह आहे. जनतेचे प्रश्‍न उपस्थित करूनच त्यानंतरच निर्णय झाले पाहिजेत. परंतु, चर्चेतून पळ काढणे, कामकाजात बाधा आणणे, लोकांचा पैसा वाया घालवणे असे अनेक प्रकार विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घडवून आणले,'' असा आरोपही त्यांनी केला. 

या उपोषणात शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, आमदार अतुल सावे, उपमहापौर विजय औताडे, शिरीष बोराळकर, प्रदीप पाटील, भाई ज्ञानोबा मुंडे, अनिल मकरिये, साधना सुरडकर, दिलीप थोरात, राजगौरव वानखेडे, शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर विकास जैन आदी सहभागी होते. 
 
Web Title: marathi news aurangabad news Deliberate confusion with opposition party in Parliament