तक्रार देऊ नये म्हणून मंत्र्यांचा दबाव

योगेश पायघन
शनिवार, 13 जानेवारी 2018

पुरावे आहेत म्हणूनच हिम्मत केली
विभागीय आयुक्त हे विभागाचे मुख्य अधिकारी आहेत उगाच त्यांच्याशी पंगा घेणे मला परवरणारे नाही.मात्र माझ्याजवळ पुरावे आहेत म्हणून मी तक्रार देण्याची हिम्मत केली आल्याचा दावा कटके यांनी केला आहे.

औरंगाबाद : जमीन विक्री परवानगी प्रकरणात निलंबित उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेतली. याप्रकरणी कायदेविषयक सल्ला घेऊन पुढील आठवड्यात निर्णय घेऊ असे पोलीस आयुक्त यशस्वी यादव म्हणाले. 

देवेंद्र कटके यांना भेटी संदर्भात विचारले असता ते म्हणाले की, मी पोलिसांना सहकार्य करतोय मात्र अद्याप मी दिलेल्या तक्रारींवर गुन्हा दाखल झालेला नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही मी तक्रार दिली आहे परंतु त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही तसेच पोलीस संरक्षणाची मागणी केली होती याविषयी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी भेट घेतली. त्यांनी डॉ. बाबासाहेब नामविस्ताराचा बंदोबस्त असल्याचे सांगत सोमवारी (ता.15) भेटायला सांगितले असल्याचे कटके यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण
जमीन विक्री परवानगी प्रकरणात 18 डिसेंम्बरला उपजिल्हाधिकारी कटके यांना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निलंबित केले. निलंबित करण्याचे अधिकार त्यांना नाहीत म्हणून कटके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली तिची सुनावणी 17 जानेवारीला होणार आहे.दरम्यान डॉ. भापकरांनी एक कोटी रुपये मागितल्याची तक्रार कटके यांनी बुधवारी (ता.10) सिटीचौक पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यात गुन्हा दाखल करण्यासंबंधी पोलिस कायदेविषय सल्ला घेत असल्याने निर्णय पुढील आठवड्यात घेणार असल्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शनिवारी स्पष्ट केले. तर कटके पुनर्स्थापित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर रॅम यांनी 5 जानेवारीला दिले असल्याचे समजते.

पुरावे आहेत म्हणूनच हिम्मत केली
विभागीय आयुक्त हे विभागाचे मुख्य अधिकारी आहेत उगाच त्यांच्याशी पंगा घेणे मला परवरणारे नाही.मात्र माझ्याजवळ पुरावे आहेत म्हणून मी तक्रार देण्याची हिम्मत केली आल्याचा दावा कटके यांनी केला आहे.

जिल्ह्याबाहेरील दबाव कुणाचा?
मी तक्रार देऊ नये म्हणून जिल्ह्याबाहेरील एका मंत्र्यांचा दबाव माझ्यावर होता.त्यांनी मला फोन करून तक्रार देऊ नका म्हणून सांगितले होते मात्र दबावाला बळी पडलो नाही. असे कटके यांनी स्पष्ट केले.मात्र त्यांनी त्या मंत्र्यांचे नाव सांगितले नाही.

Web Title: Marathi news Aurangabad news Devendra Katke statement