औरंगाबाद: सिटीचौक भागात कापड शिलाईच्या फॅक्ट्रीला आग

मनोज साखरे
बुधवार, 31 जानेवारी 2018

आगीत फॅक्ट्रीतील शिलाई यंत्रे व कापडाचा माल पूर्णतः जळाला. आगीचे कारण व दुकान मालकाचे नाव अजून स्पष्ट झाले नाही.

औरंगाबाद : औरंगाबादेतील सिटीचौक भागात कापड शिलाईच्या फॅक्ट्रीला आग लागल्याची घटना बुधवारी (ता, 31) सकाळी सव्वासातच्या सुमारास घडली.

तासभर सुरु असलेल्या आगीत सुमारे 30 लोकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सिटीचौक सारख्या गजबजलेल्या भागात कापड शिलाईच्या फॅक्ट्रीला आग लागल्याने बाजूलाच असलेल्या पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तसेच नागरिकांनी पळापळ करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. यानंतर अग्निशामक दलाच्या जवानाने एका बंबाच्या साह्याने तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले.

आगीत फॅक्ट्रीतील शिलाई यंत्रे व कापडाचा माल पूर्णतः जळाला. आगीचे कारण व दुकान मालकाचे नाव अजून स्पष्ट झाले नाही.

Web Title: Marathi news Aurangabad news fire