जुन्या शहराचा कचरा डेपो

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

औरंगाबाद - शहरातील कचऱ्याची परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा दावा महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांतर्फे केला जात असला तरी अद्याप प्रभाग एक, दोन व तीनमधील कचऱ्याचे चित्र भयावह आहे. मोकळ्या जागा, रस्ता, दुभाजकांमध्ये हजारो टन कचरा पडून असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका कायम आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात प्रशासनाला अपयश येत असताना त्यात दररोज शेकडो टन नव्या कचऱ्याची भर पडत आहे. 

शहरातील कचरा कोंडीला मंगळवारी ३३ दिवस पूर्ण झाले. महिनाभरापासून महापालिका, जिल्हा प्रशासन; तसेच विभागीय आयुक्त, नगरविकास विभागाचे राज्यातील प्रमुख अधिकारी कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अद्याप परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. शहरातील जुन्या भागात म्हणजेच प्रभाग एक, दोन व तीनमध्ये फेरफटका मारल्यास कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे भयावह चित्र पाह्यला मिळते. या ढिगाऱ्यांमधून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. प्रत्येक ठिकाणी कचऱ्याला आगी लावण्यात आल्या आहेत. जुना कचरा उचलण्यात प्रशासनाला अपयश आलेले असताना दररोज नवा शेकडो टन कचरा रस्त्यावर येत आहे. त्यामुळे कचरा उचलता-उचलता प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. 

घोषणा अनेक, कारवाई शून्य
कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची सर्वप्रथम घोषणा करण्यात आली; मात्र अद्याप रस्त्यावर नागरिक कचरा फेकत असून, तो ओला-सुका एकत्रच टाकण्यात येत आहे. त्यांच्यावर अद्याप कारवाई सुरू करण्यात आलेली नाही. आठवड्यातील दोनच दिवस सुका कचरा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. प्लॅस्टिक बंदीची घोषणादेखील हवेतच विरली आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. 

Web Title: marathi news aurangabad news garbage