औरंगाबादची "कचरा कोंडी' कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

औरंगाबाद - शहर परिसरात 27 व्या दिवशीही औरंगाबादची "कचरा कोंडी' कायम असून, गुरुवारी (ता. 15) तीन ठिकाणी महापालिकेच्या कचऱ्याने भरलेल्या गाड्या अडविण्यात आल्या. गांधेली येथे ग्रामस्थांनी दिवसभर खडा पहारा दिला होता. दरम्यान, मिटमिटा भागात कचऱ्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांना मारहाण करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

शहरातील कचऱ्याची कोंडी फोडण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी बैठक घेऊन सात दिवसांनंतरही येथील परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. राज्यातील 16 अधिकाऱ्यांची त्यांनी कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी औरंगाबादेत नियुक्ती केली आहे. हे अधिकारी प्रभागनिहाय ओला-सुका कचरा वेगवेगळा जमा करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी रोज सुमारे दीडशे टन ओला-सुका एकत्र कचरा रस्त्यावर येत असून कचऱ्यावर प्रक्रियेसाठी जागांना विरोध होत असल्याने महापालिकेसमोरील अडचणी संपलेल्या नाहीत.

दरम्यान, मिटमिटा भागात हिंसक आंदोलन करणाऱ्या नागरिकांना मारहाण केल्याप्रकरणी तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत कचरा टाकला म्हणून महापालिका प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: marathi news aurangabad news garbage issue