पोलिसांकडून दगडफेक, वाहने फोडल्याचे प्रकार सीसीटीव्हीतून उघड

मनोज साखरे
गुरुवार, 8 मार्च 2018

शाळा बंद, गावकऱ्यांनी पाळला बंद
मिटमिटा येते पोलिसांकडून झालेल्या प्रकारानंतर गावात दहशत आहे, महिला घरातून बाहेर यायलाही तयार नसून शाळाही बंद आहेत. अतोनात अत्याचाराच्या निषेधार्थ मिटमिटा, पडेगाव येथे गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आहे.

औरंगाबाद : कचऱ्यावरून औरंगाबादेत एकविसाव्या दिवशीही धग कायम आहे. पोलिसांनी गावात दहशत माजवून महिला, लहान मुलांना मारहाण केल्याचा आरोप मिटमिटा येथील गावकऱ्यांनी केला. पोलिसांनी गावात दगडफेक करून वाहने व खिडक्यांच्या काचा फोडल्याचे सीसीटीव्हीतून उघड झाले. 

मिटमिटा येथील सफारी पार्क येथे कचरा टाकण्यास  गावकाऱ्यांकडून विरोध झाला. त्यानंतर बुधवारी (ता, 7) मिट मिटमिटा येते रस्त्यावर मोठा जनक्षोभ उसळला. यानंतर हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. अश्रूधुराच्या नालकांड्या फोडल्या. चार तासानंतर प्रकरण शांत झाले. परंतु या दरम्यान पोलिसांनी आंदोलनाशी संबंध नसलेल्या गावातील महिलांना, मुलांना बेदम मारहाण केली. त्यानंतर घराघरासमोरील वाहने फोडली. दरवाज्यावर दगड घातले, दगडफेक करून काचा फोडल्या. त्यानंतर अतितायीपणा पोलिसांनी केला, असा आरोप गावकरी माहिलांनी केला आहे,  सीसीटीव्हीत हे प्रकार कैद झाले आहेत.

शाळा बंद, गावकऱ्यांनी पाळला बंद
मिटमिटा येते पोलिसांकडून झालेल्या प्रकारानंतर गावात दहशत आहे, महिला घरातून बाहेर यायलाही तयार नसून शाळाही बंद आहेत. अतोनात अत्याचाराच्या निषेधार्थ मिटमिटा, पडेगाव येथे गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आहे.

Web Title: Marathi news Aurangabad news garbage issue police action