महापालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फेकला कचरा 

cnp
cnp

औरंगाबाद - शहरातील कचऱ्याची कोंडी मागील नऊ दिवसांपासून महापालिका प्रशासन व राज्यकर्त्यांना सोडविता आला नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून प्रशासन, पदाधिकारी अद्याप गंभीर नसल्याचा निषेध करीत शनिवारी (ता. 24) राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने महापालिकेच्या प्रवेशद्वारातच "कचरा फेको' आंदोलन केले. रिक्षा भरून कचरा महापालिकेच्या गेटवर फेकण्यात आला. 
मुख्यमंत्र्यांपासून ते पालकमंत्र्यांपर्यंत सर्वांनी प्रयत्न करूनसुद्धा शहराची कचराकोंडी फुटलेली नाही. शहरात सुमारे तीन ते साडेतीन हजार टन कचऱ्याचे ढिगारे वेगवेगळ्या भागांत पडून आहेत. नऊ दिवस उलटले तरी महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांना कचऱ्याची कोंडी फोडता आली नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने शनिवारी महापालिकेसमोर आंदोलन करीत कचरा फेकला. शहर जिल्हा अध्यक्ष दत्ता भांगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शहरात साचलेला कचरा एका रिक्षाने आणून महापालिका गेटवर फेकला. या वेळी महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येत्या दोन दिवसांत कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर महापौर व आयुक्तांच्या बंगल्यावर कचरा फेकू, असा इशारा श्री. भांगे यांनी या वेळी दिला. आंदोलनात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे ग्रामीण कार्याध्यक्ष रहीम पटेल, सुनील चव्हाण, अमोल साळवे, अफरोज पटेल, कैलास कुंटे पाटील, अक्षय डक, धनंजय जाधव, आनंद मगरे, अनिल बोरकर, आकाश गवई, शाहरूख बागवान, आनंद मगरे, सहभागी होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com