मृत व्यक्‍ती जीवंत झाला अन्‌ बघ्यांनी गोंधळ केला !

योगेश पायघन
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

औरंगाबाद - बऱ्याचदा चांगला माणुसही उपचार सुरु असताना दगावल्याचे अनेक उदाहरणे आहेत. दुसरीकडे काही रुग्णाच्या बाबतीत खालावलेली तब्येत पाहून आता याचे काही खरे नाही, असे बोलतात. मात्र, उपचार सुरु असताना कधी काय होईल, हे सांगता येत नाही. येथील घाटी रुग्णालयाने मृत घोषित केल्यानंतर संबधितास घरी नेण्यात आले. मात्र, घरी हालचाल झाल्याचे निदर्शनास येताच नातेवाईकांनी तातडीने पुन्हा रुग्णालय गाठले. मृत व्यक्‍ती जीवंत झाला, पळा पळा, अशी चर्चा होताच बघ्यांनी एकच गोंधळ केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. सहा) येथे घडला. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये (टि.आय.सी.यु.) शहरानजीक असलेल्या जटवाडा येथील चाळीस वर्षीय आप्पासाहेब दाभाडे यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांना शुक्रवारी (ता. सहा) सकाळी सहा वाजेच्या सुमारास मृत घोषीत करण्यात आले. त्यामुळे नातेवाईक त्यांना घरी घेऊन गेले. मात्र, घरी गेल्यानंतर त्यांच्या हालचाली झाल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले.

यानंतर नातेवाईकांनी त्यांना दुपारी बारा वाजेच्या सुमारास पुन्हा घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल केले. तेथे इसीजी केल्यावर काही पल्स आल्याने दाभाडे जिवंत असल्याचा समज झाला. जिवंत माणसाला मृत घोषीत केले, असे म्हणत नातेवाईकांनी रोष व्यक्‍त केला. 

यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. हा प्रकार समजताच वैद्यकीय अधिक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी अपघात विभागात धाव घेत रिपोर्ट चेक करीत नातेवाईकांची समजुत काढली. दरम्यान, मृत व्यक्‍ती जीवंत झाल्याच्या अफवेमुळे बघ्यांनी अपघात विभागाला गराडा घातला होता. 

Web Title: marathi news aurangabad news Govt. hospital dead patient

टॅग्स