शेंद्रा-बिडकीनमधील पायाभूत  सुविधांचे औपचारिक भूमिपूजन 

आदित्य वाघमारे
शनिवार, 21 एप्रिल 2018

औरंगाबाद - आधी सुविधा मग उद्योग, हे जगातील औद्योगिक जगताचे "मॅग्नेट' लक्षात घेत जागतिक दर्जाच्या सुविधांची निर्मिती "ऑरिक'मध्ये केली जाते आहे. देशाच्या दिल्ली- मुंबई औद्योगिक क्षेत्रातील पहिली स्मार्ट इंटिग्रेटेड स्मार्ट सिटी म्हणून शेंद्रा, बिडकीन कार्यान्वित होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

बिडकीन या डीएमआयसी नोडच्या भूमिपूजनप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी शनिवारी (ता. 21) संवाद साधला. केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार चंद्रकांत खैरे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, इम्तियाज जलील, संदिपान भुमरे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापौर नंदकुमार घोडेले, अल्केश शर्मा, गजानन पाटील, प्रसाद जस्ती आदींची उपस्थिती होती. 

वॉक टू वर्क कल्चरसह तयार होणाऱ्या शेंद्रा, बिडकीन या वसाहतींचे काम वेळेपूर्वी पूर्ण होईल. ड्रायपोर्ट, समृद्धी महामार्गाचा मोठा फायदा ऑरिकला मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमात "ऑरिक'साठीचे मोबाईल ऍप, स्मार्ट कार्डचे लॉंचिंग आणि तीन लघु उद्योजकांना प्लॉटचे हस्तांतरण पत्र देण्यात आले. दरम्यान, कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ छायाचित्रकाराला धक्काबुक्की झाल्याबाबत संबंधित पोलिसांवर कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. 

काय म्हणाले मुख्यमंत्री... 
नव्या महापालिका आयुक्तांची नियुक्ती, आठ दिवसांत रुजू होणार 
15 वर्षांत न मिळालेला पैसा दिला. कामांना वेग देण्याचा प्रयत्न 
परळी वैजनाथ येथील औष्णिक केंद्रासाठी पाण्याची व्यवस्था 
किया मोटर्स मोफत जमिनींसह सबसिडी मिळाल्याने ती आंध्रप्रदेशात 
ह्योसंगनंतर 150 कंपन्यांना येथे आणण्याचा प्रयत्न 
विमानतळ विस्तारीकरण, रनवेसाठी मंजुरी, रस्त्यांच्या कामांना मंजुरी 
 
Web Title: marathi news aurangabad news ground of breaking ceremony of bidkin industial city