बोलबाला औरंगाबादच्या 'व्हाईट नॉईज बॉईज'चा !

अतुल पाटील
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

औरंगाबादचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी 'व्हाईट बॉईज'नी पहिलेच गाणे 30 सप्टेंबरला लॉंच केले असून यु ट्युबवर ते अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. "वुई आर द बेस्ट'च्या माध्यमातून आजकालच्या युवकांची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात ऍट्रॅक्‍शन, लव-अफेअर, करिअर हे विषय हाताळण्यात आले आहेत.

औरंगाबाद : ही अशी गाणी आहेत; ऐकली, पाहिली की पाश्‍च्यात्य गाण्याची, संगीताची आठवण होते. यातीलच "हिप हॉप'चे लोण आता औरंगाबादपर्यंत पोहचलेय. याप्रकारात "फ्री स्टाईल रॅप सॉंग' लॉन्च करुन औरंगाबादच्या "व्हाईट नॉईज'च्या बॉईजनी या क्षेत्रात बोलबाला निर्माण केला आहे. 

मुंबई, पुणेनंतर कोल्हापुरातील तरुण रॅप साँग लॉंच करण्यासाठी अग्रेसर आहेत. ते आपापल्या शहराचे प्रतिनिधीत्व करत असतानाच नावही उंचावत आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर औरंगाबादच्या कलाकारांनी एकत्रित येत "व्हाईट नॉईज'ची सुरवात केली आहे. यात रॅपिंग रोहित गुंजकर, गिटारिस्ट गौरव सरोसे, डायरेक्‍शन ऍण्ड सिनेमॅटोग्राफीसाठी शंतनू भाले आणि आकाश नागरे हे आपापली भुमिका निभावत आहेत. 

डबस्टेप, ट्रान्स, इडियम रॉक साँग याची माहिती आहे. मात्र, औरंगाबादच्या कलाकारांना फ्री स्टाईल रॅप सॉंगने भुरळ घातली आहे. अडीच वर्षापूर्वी रोहित गुंजकरने 'इसे कहते है मेसा मेसा' हे गाणे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केले होते. त्यानंतर 'द रिऍलिटी'च्या माध्यमातून भ्रष्टाचार, विकास, माणुसकी आणि आजकालचा युवक यावर भाष्य केले होते. 

इंजिनिअर्सना जडलाय छंद 
रॅप सॉंग करण्यात इंजिनिअर्स आघाडीवर आहेत. "व्हाईट नॉईज'मध्येही इंजिनिअरच आहेत. छंदाचे रुपांतर बिझनेसमध्ये झालेय. रोज दोन तास वेळ द्यावा लागतो, दर रविवारी गेट टुगेदरमध्ये नवीन कन्सेप्टवर चर्चा झडते. याबाबत काहींच्या घरातून विरोध तर काहींना समर्थन मिळतेय. गाणी पाहिल्यानंतर अनेकदा विरोधाचे सुर मावळल्याचे या ग्रुपचे सदस्य सांगतात. 

"वुई आर द बेस्ट' 
औरंगाबादचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी 'व्हाईट बॉईज'नी पहिलेच गाणे 30 सप्टेंबरला लॉंच केले असून यु ट्युबवर ते अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. "वुई आर द बेस्ट'च्या माध्यमातून आजकालच्या युवकांची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात ऍट्रॅक्‍शन, लव-अफेअर, करिअर हे विषय हाताळण्यात आले आहेत.

Web Title: Marathi news Aurangabad news hip hop song Marathi rap