कोपर्डी निकालानंतरचे ‘ते’ वाक्‍य अंतिम नव्हे

Ujjwal-Nikam
Ujjwal-Nikam

औरंगाबाद - खैरलांजी, सोनई आणि कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा झाल्यानंतर काही प्रतिक्रिया दु:ख देणाऱ्या होत्या. त्यामुळेच मी ‘यापुढे असे खटले लढणार नाही’ असे म्हणालो होतो; मात्र ते वाक्‍य अंतिम नाही, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले.

देवगिरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या क्‍वसार्स स्नेहसंमेलनाच्या उद्‌घाटनासाठी गुरुवारी (ता. २२) ते शहरात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेविषयी त्यांनी हे चुकीचे घडले असल्याचा पुनरुच्चार केला. असे काही घडत असेल तर, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी राहिली पाहिजे, असेही ॲड. निकम म्हणाले.

क्वसार्सच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्‌घाटन ॲड. निकम यांनी केले. या वेळी उद्योगपती ऋषी बागला, मशिप्रचे सचिव आमदार सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर, डॉ. उल्हास शिऊरकर यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ॲड. निकम यांनी कवितेने सुरवात करत तरुणाईची मने जिंकली. ते म्हणाले, ‘‘आत्मविश्‍वास हा यशाची खात्री देत नाही; परंतु हाच आत्मविश्‍वास जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा देत असतो. म्हणून तो कसा वाढीस लागेल, याची खात्री ठेवली पाहिजे. आपल्या मनाला बोलायला शिकवले पाहिजे. काय प्रतिक्रिया येऊ शकते, यावरून यशाचा मार्ग सापडू शकतो.’’

गुरू अन्‌ वेळ खूप शिकवते
गुरू आणि वेळ माणसाला खूप काही शिकवते. गुरू आधी शिकवतो, मग परीक्षा घेतो; तर वेळ आधी परीक्षा घेते मग शिकवते. इतिहास वाचणे ही काळाची गरज आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी काय केले? हा इतिहास कसा कळेल. यासाठी हा इतिहास समजणे काळाची गरज आहे. दहशतवाद्यांशी लढताना देशातील सामाजिक स्वास्थ्य चांगले हवे, ते ठेवण्याचे काम तरुणांनी केले पाहिजे, असेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com