'पुरुष आयोग' स्थापनेसाठी 'पत्नी पीडितां'चे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

औरंगाबाद - घरगुती हिंसाचारापासून पुरुषांना संरक्षण मिळण्यासाठी महिला आयोगाच्या धर्तीवर "पुरुष आयोगा'ची स्थापना करावी, अशी मागणी "पत्नी-पीडित पुरुष आघाडी'ने केली आहे. त्यासाठी आघाडीच्या सदस्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता. 15) धरणे आंदोलन केले. आंदोलनात पंधरा ते वीस सदस्य सहभागी होते.

घरघुती हिंसाचारापासून पुरुषांचे संरक्षण अधिनियम लागू करा, कलम 498 (अ ) चा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर करवाई करावी, पोटगी भरण्यास असमर्थ ठरणाऱ्यास तुरुंगात पाठविणे बंद करुन संबंधितास कुवतीप्रमाणे सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, त्यातून पोटगीवसूल करावी, कौटुंबिक वाद न्यायालयात गेल्यास उभयतास एका वर्षात घटस्फोट मंजूर करावा, अशा काही मागण्या "पत्नी-पीडित पुरुष आघाडी'ने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मांडल्या आहेत. तसेच, पुरुषांचा केवळ पुरुष म्हणून होत असलेला छळ थांबावा, त्यासाठी पुरुष आयोग स्थापन करावा, पुरुष तक्रार निवरण केंद्र सुरु करावे, पत्नीपीडिताचा पोलिस ठाण्यात होणारा छळ थांबावा, पुरुष व बालकल्याण विभाग सुरू करावा, अशाही मागण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: marathi news aurangabad news man security agitation