सोशल मीडियावर मराठी भाषेचाच बोलबाला

marathi social media
marathi social media

औरंगाबाद - जागतिकीकरणात मराठी भाषेचे अस्तित्व कसे टिकणार, भाषा जगवावी लागेल, अशी कितीही कोरडी ओरड सुरू असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमात चर्चेसाठी, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी सर्वाधिक मराठी भाषा वापरली जात आहे. यामुळे ई-बुक, मराठीच्या विविध साईट्‌सवर तरुण मंडळी सर्च करत वाचन करीत आहेत. श्रेष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरी केली जाते. मागील काही वर्षांत रिमिक्‍सच्या युगात शुद्ध मराठी भाषेची अपेक्षा कशी ठेवायची, आपल्या मायबोलीचे कसे होणार, अशा शंका उपस्थित करीत गळे काढले जात आहेत. मात्र, सर्वाधिक वेगाने एकमेकांपर्यंत संदेश पोचविण्याचे माध्यम असलेल्या सोशल मीडियावर केवळ मराठी बोलणारीच नव्हे तर सतत इंग्रजीत बोलणारी तरुणाई मराठीमध्येच लेखन करीत आहे. त्यामुळे जवळपास 80 टक्‍क्‍यांहून अधिक मोबाईलधारक मराठी टायपिंगचे ऍप वापरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही बाब अभिमानाची व कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे मराठी भाषेबद्दल मराठी माणसांच्या मनात किती प्रेम आहे, हे शुभेच्छांच्या देवाण-घेवाणीवरून पाहायला मिळते. झपाट्याने बदलणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात बदल स्वीकारतच पुढे जावे लागणार, हे सत्य आहे. बदलाची कास धरूनच पुढे जाणे क्रमप्राप्त ठरत असताना "जुने ते सोने' या म्हणीप्रमाणे तसेच तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या साधनांमुळे मराठी भाषेचाच बोलबाला बघायला मिळत आहे. सरकारी कार्यालयांत भाषेबद्दल अनास्था बॅंकांसह राज्य सरकार, केंद्र सरकारच्या कार्यालयांत अमराठी अधिकाऱ्यांचा भरणा आहे. अशा ठिकाणी सामान्य माणूस आपले काम घेऊन गेला असता त्यांच्या मराठी बोलीभाषेकडे वेगळ्या नजरेतून पाहिले जाते. विशेषत: जर अर्ज, पत्रव्यवहार मराठीतून केला असता, जणू काही चूकच केलीय, असे निरीक्षण केले जाते, असा अनुभव अनेकजण सांगतात. मराठीचे फारसे ज्ञान नसल्याने बॅंकांमध्ये तर पासबुक व अन्य कामकाजात अनंत चुका केल्याचे दिसून येते. त्यामुळे सरकारी कार्यालयांतच भाषेबद्दल अनास्था असल्याचे स्पष्ट होते. शासकीय व निमशासकीय कार्यालयांत मराठी भाषेचाच वापर व्हायला हवा. कष्टकऱ्यांचे बॅंकांमध्ये खाते असल्याने त्यांचा सातत्याने तिथे संबंध येतो. मात्र, आजही त्यांच्याशी मराठीत नव्हे तर इंग्रजी भाषेतूनच व्यवहार होतो. अनेकांना पासबुकवरील नोंदी कळत नसल्याने इतरांकडे विनवणी करावी लागते. त्यामुळे मराठीतून बोलणे, लिहिण्याचा आग्रह धरण्याचा रेटा वाढायला हवा. - प्राचार्य रा. रं. बोराडे, ज्येष्ठ साहित्यिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com