हल्लाबोल यात्रेचा शनिवारी समारोप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मराठवाड्यात आयोजित केलेल्या हल्लाबोल यात्रेचा समारोप औरंगाबादेत शनिवारी (ता. 3) केला जाणार आहे. यानिमित्ताने रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप सभा होणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून 16 जानेवारीला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला सुरवात झाली होती. नऊ दिवसांत मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील 26 तालुक्‍यांतील 26 मतदारसंघांतून जवळपास दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांनी 26 सभा, मोर्चे, पदयात्रा, मोटारसायकल रॅली, बैठका आदींच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

Web Title: marathi news aurangabad news marathwada news hallabol yatra ncp