औरंगाबाद विद्यापीठाच्या उपकुलसचिवांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंझा उपकुलसचिव आहेत. त्यांनी महाविद्यालयात कारकुनाची नोकरी लावण्यासाठी एका सुशिक्षित बेरोजगरकडून चक्क तीन लाख रुपये घेतले; पण नोकरी लावली नाही.

औरंगाबाद : नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगाराची फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव ईश्वर मंझा याना आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली. हि कारवाई सोमवारी (ता. 19) रात्री उशिरा करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंझा उपकुलसचिव आहेत. त्यांनी महाविद्यालयात कारकुनाची नोकरी लावण्यासाठी एका सुशिक्षित बेरोजगरकडून चक्क तीन लाख रुपये घेतले; पण नोकरी लावली नाही. त्यामुळे बेरीजगार तरुणाने पैसे परत मागितले. पण मंझा यांच्याकडून केवळ धनादेश देण्यात आला तो बँकेत वठला नव्हता.

याप्रकरणात तक्रार दाखल झल्यानंतर मंझा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. त्यानंतर मंझा याना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या अटकेची बातमी पसरताच विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली असून याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Web Title: Marathi news Aurangabad news Marathwada university