पालकमंत्र्यांवर खासदार खैरेंना भरोसा नाय का? ः बोराळकर 

प्रकाश बनकर
शुक्रवार, 18 मे 2018

खासदार खैरेंची स्मरणशक्‍ती गेली  - आमदार सावे 
शहरात दंगल पेटलेली असताना आमदार अतुल सावे येथे नसल्याचा आरोप खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यांच्या या वक्‍तव्याचा आमदार सावे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, की मी तीन वेळा खैरेंचे मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले. तरीही मी तिथे नसल्याचा ते दावा करतात. एकतर खासदार खैरे यांची स्मरणशक्ती गेलेली दिसतेय किंवा काही तरी बिघडलेले दिसतेय, असा टोला त्यांनी लावला. आमच्यावर लक्ष ठेवायला आमचे पक्षश्रेष्ठी आहेत. तुम्ही विकासावर बोला, असेही श्री. सावे म्हणाले. 

औरंगाबाद - शहरात झालेल्या दंगलीनंतर गृहराज्यमंत्री रणजित पाटील व आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दंगलग्रस्त ठिकाणी भेट देत पाहणी केली होती. त्या वेळी दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करून दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. असे असताना खासदार चंद्रकांत खैरे हे मुख्यमंत्र्यांवर टीका करून वेगळी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे त्यांचा पालकमंत्र्यांवर विश्‍वासच नाही, असा आरोप भाजपचे प्रवक्‍ते शिरीष बोराळकर यांनी केला. 

आठवडाभरापूर्वी झालेल्या दंगलीच्या घटनेनंतर युतीतील नेते एकमेकांवर कुरघोडी करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपने शुक्रवारी (ता. 18) पत्रकार परिषद घेतली. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, अनिल मकरिये, जगदीश सिद्ध आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

या वेळी श्री. बोराळकर यांनी सत्तेत सहभागी असलेल्या आपल्या मित्रपक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "दंगलप्रकरणी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे खासदार श्री. खैरे यांनी राजकारण सुरू केले आहे. श्री. खैरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत चुकीचा शब्दप्रयोग केला असून, आम्ही त्याचा निषेध करतो. त्यांना पालकमंत्री डॉ. सावंत यांची भूमिका मान्य नाही का? दोघांच्या भूमिकेमुळे दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. शहराच्या विकास आणि नवीन औद्योगिक निर्मितीबाबत कोणी बोलतच नाही.' दंगेखोरांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतरही केवळ राजकीय स्वार्थासाठी शिवसेना मोर्चा काढत असल्याचे सांगत श्री. बोराळकर यांनी या मोर्चात भाजप सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. 

खासदार खैरेंची स्मरणशक्‍ती गेली ः आमदार सावे 
शहरात दंगल पेटलेली असताना आमदार अतुल सावे येथे नसल्याचा आरोप खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यांच्या या वक्‍तव्याचा आमदार सावे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, की मी तीन वेळा खैरेंचे मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले. तरीही मी तिथे नसल्याचा ते दावा करतात. एकतर खासदार खैरे यांची स्मरणशक्ती गेलेली दिसतेय किंवा काही तरी बिघडलेले दिसतेय, असा टोला त्यांनी लावला. आमच्यावर लक्ष ठेवायला आमचे पक्षश्रेष्ठी आहेत. तुम्ही विकासावर बोला, असेही श्री. सावे म्हणाले. 

Web Title: marathi news aurangabad news mp chandrakant khaire dose not have trust on guardian minister dr. sawant