औरंगाबादेतील रस्त्यावर साचला सातशे टन कचरा 

माधव इतबारे
शनिवार, 24 मार्च 2018

शहरातील कचऱ्याची कोंडी 35 दिवसानंतरही कायम आहे. जुन्या शहरासह अनेक भागात रस्त्यावर, मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग पडून असून, त्यातून सुटलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. कचरा विधिमंडळात गाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दखल घेत यंत्रणा कामाला लावली. मात्र पालकमंत्री दीपक सावंत यांना उसंत मिळत नव्हती. नारेगाव येथील आंदोलकांची महिनाभरापूर्वी भेट घेतल्यानंतर ते औरंगाबादकडे फिरकले नव्हते. दरम्यान शनिवारी त्यांना औरंगाबादमधील कचऱ्याची आठवण झाली

औरंगाबाद - शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न देशभर गाजत असताना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांना महिनाभरानंतर उसंत मिळाली आहे. शनिवारी (ता.14) शहरात येऊन त्यांनी आढावा घेतला व प्रशासनाला शाबासकी दिली. सध्या केवळ सातशे टन (पाच टक्के) कचरा रस्त्यावर असून, येत्या महिनाभरात हा प्रश्‍न मार्गी लागेल, असा दावाही डॉ. सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. 

शहरातील कचऱ्याची कोंडी 35 दिवसानंतरही कायम आहे. जुन्या शहरासह अनेक भागात रस्त्यावर, मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग पडून असून, त्यातून सुटलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. कचरा विधिमंडळात गाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दखल घेत यंत्रणा कामाला लावली. मात्र पालकमंत्री दीपक सावंत यांना उसंत मिळत नव्हती. नारेगाव येथील आंदोलकांची महिनाभरापूर्वी भेट घेतल्यानंतर ते औरंगाबादकडे फिरकले नव्हते.

दरम्यान शनिवारी त्यांना औरंगाबादमधील कचऱ्याची आठवण झाली व शहरात येत काही भागात पाहणी केली. जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्तांसोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, 16 फेब्रुवारीपासून शहरात 15 हजार मेट्रिक टन निर्माण झाला होता. त्यातील 14 हजार 646 मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. 

सध्या केवळ पाच टक्के म्हणजे, 702 टन कचरा रस्त्यावर पडून असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, शहरातील अनेक रस्त्यावर यामुळे दुर्गंधी पसरली आहे. अशा रस्त्यावरून जाताना नाका- तोंडाला रूमाल बांधूनच फिरावे लागत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. 

Web Title: marathi news aurangabad news Municipal Corporation Garbage problem

फोटो गॅलरी