‘ऑरिक’कडे वळू लागली बड्या उद्योगांची पावले

आदित्य वाघमारे
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - जपानी तंत्रज्ञानावर आधारित काँक्रिट प्रिकास्टमध्ये काम करणारी ‘फुजी  सिल्व्हरटेक’ ही कंपनीही शेंद्रा येथील औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीत १५० कोटींची गुंतवणूक करणार आहे. यासाठीचा सामंजस्य करार ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कॉन्क्‍लेव्हमध्ये केला जाणार आहे. 

औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीमध्ये अँकर प्रकल्पांसाठी राखीव ठेवलेल्या दोनपैकी एक शंभर एकराचा भूखंड हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यालगत अन्य प्रकल्पांची पावलेही शेंद्रा येथील ऑरिककडे वळायला लागली आहेत.

औरंगाबाद - जपानी तंत्रज्ञानावर आधारित काँक्रिट प्रिकास्टमध्ये काम करणारी ‘फुजी  सिल्व्हरटेक’ ही कंपनीही शेंद्रा येथील औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीत १५० कोटींची गुंतवणूक करणार आहे. यासाठीचा सामंजस्य करार ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कॉन्क्‍लेव्हमध्ये केला जाणार आहे. 

औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीमध्ये अँकर प्रकल्पांसाठी राखीव ठेवलेल्या दोनपैकी एक शंभर एकराचा भूखंड हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यालगत अन्य प्रकल्पांची पावलेही शेंद्रा येथील ऑरिककडे वळायला लागली आहेत.

टेक्‍स्टाईल आणि वैद्यकीय सामग्री तयार करणाऱ्या दोन कंपन्यांशी करार झाल्यानंतर शेंद्रा येथे जपानी काँक्रिट प्रिकास्ट तंत्रज्ञानासह काम करणारी कंपनीही ऑरिक येथे येऊ घातली आहे. फुजी सिल्व्हरटेक या कंपनीने शेंद्रा येथे येण्यास रस दाखविला असल्याने त्यांचाशी चर्चा करण्यात आली. ऑरिकमध्ये त्यांना स्थान देण्यासाठी बैठका मुंबईत पार पडल्या आणि त्यानंतर कंपनीशी सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेण्यात आला. फुजी सिल्व्हरटेक या कंपनीसह औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रिकास्ट डक्‍ट, स्टॉर्म वॉटर यंत्रणा, भिंती, सिंचनासाठीचे कालवे, पार्किंगसाठी काँक्रिटच्या वस्तू, प्लॅटफॉर्म निर्माण करणारी कंपनी शेंद्रा येथे १५० कोटींची गुंतवणूक करणार आणि २०० जणांसाठी थेट रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरियन कंपन्यांकडूनही विचारणा
‘ह्योसंग’च्या निमित्ताने उद्योजकांचे जाळे तयार करण्यासाठी मदत होणार आहे. या कंपनीचे व्हेंडर उद्योग आणि त्याला पूरक अशा कंपन्यांनी ऑरिकला भूखंडाबाबत विचारणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक नवे उद्योग ऑरिकमध्ये येण्याची शक्‍यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही स्टील उद्योगांत असलेल्या कंपन्यांनीही ऑरिकमधील जागेची पाहणी केली होती.

औरंगाबादच्या लघुउद्योजकांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा
औरंगाबाद - ‘मॅग्नेटिक  महाराष्ट्र’च्या रूपाने औरंगाबादेतील लघु उद्योजकांच्या दालनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत त्यांच्याशी चर्चा केली. औद्योगिक वसाहतीमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी बैठक बोलावून प्रश्‍ने मार्गी लावू, असे आश्वासन मिळाल्याची माहिती मसिआचे अध्यक्ष सुनील कीर्दक यांनी दिली. 

औरंगाबाद आणि मराठवाड्यात कार्यरत असलेल्या मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरशी (मसिआ) संबंधित असलेल्या लघु उद्योजकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. १९) संवाद साधला. या निमित्ताने मसिआने सादर केलेल्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी चर्चा केली. ग्रामपंचायतींशी निगडित असलेल्या आडचणी आणि भाडेकरू उद्योजकांच्या प्रश्‍नांबाबात त्यांनी आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. त्यावर बैठक बोलावून हा विषय मार्गी लावण्याचे आश्‍वासन त्यांनी मसिआला दिल्याची माहितीही कीर्दक यांनी दिली. 

इतक्‍या उद्योजकांशी संवाद कसा साधता?
मसिआ ही गेल्या चाळीस वर्षांपासून मराठवाड्यात कार्यरत असलेली औद्योगिक संघटना आहे. या संघटनेशी कनेक्‍ट कसा ठेवता याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मसिआच्या पदाधिकऱ्यांना विचारली. त्यावर ही यंत्रणा समजावून सांगत ‘उद्योग संवाद’ हे प्रकाशनही त्यांना सुपूर्द केले असल्याची माहिती कीर्दक यांनी दिली.

Web Title: marathi news aurangabad news oric big business