‘ऑरिक’चे आता मिशन दक्षिण कोरिया

आदित्य वाघमारे
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - ‘ह्योसंग’च्या रूपाने अँकर प्रकल्पाची बंपर इन्व्हेस्टमेंट पटकावल्यानंतर शेंद्रासाठी ऑरिककडून ‘मिशन दक्षिण कोरिया’ हाती घेण्यात येणार आहे. कोरियन कंपन्यांची गुंतवणूक शेंद्रा येथे व्हावी, यासाठी द्विपक्षीय चर्चांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद - ‘ह्योसंग’च्या रूपाने अँकर प्रकल्पाची बंपर इन्व्हेस्टमेंट पटकावल्यानंतर शेंद्रासाठी ऑरिककडून ‘मिशन दक्षिण कोरिया’ हाती घेण्यात येणार आहे. कोरियन कंपन्यांची गुंतवणूक शेंद्रा येथे व्हावी, यासाठी द्विपक्षीय चर्चांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

‘ह्योसंग’च्या साडेतीन हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या निमित्ताने करण्यात आली. ही घोषणा होताच या कंपनीच्या सहकारी उद्योगांची विचारणा ‘ऑरिक’कडे सुरू झाली आहे. या चौकशीच्या माध्यमातून नव्या कोरियन कंपन्या शेंद्रा येथे आणण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्याचबरोबर ऑरिकला कोरियन वसाहतीचे रूप देण्याचा प्रयत्नही केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

हे संबंध अधिक पुढे नेण्यासाठी ऑरिकची टीम कोरियन औद्योगिक संघटनांची भेट घेऊन शेंद्रा येथील सुरू असलेले काम आणि त्यात उभारल्या जाणाऱ्या उद्योगांची माहिती दिली जाण्याची शक्‍यता आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या निमित्ताने अँकर प्रकल्प देणाऱ्या कंपनीने अन्य कोरियन उद्योगांशी चर्चा घडवून आणण्यासाठी अनुकूलता दर्शविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरियन वसाहत वसविण्याचा प्रयत्न 
औरंगाबाद या ऐतिहासिक शहरालगत अद्याप कोणत्याही परदेशी राष्ट्राला अपेक्षित अशी वसाहत अद्याप तयार झालेली नाही. दक्षिण कोरियन कंपन्यांचा ओघ वाढल्यास ऑरिकमध्ये कोरियन वसाहत तयार करण्याचा मानस औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशिपचा आहे. त्यात कोरियन शाळा, कोरियन रहिवासी वसाहत आदींचा समावेश राहण्याची शक्‍यता आहे. देशात अशा प्रकारची वसाहत अद्याप कोठेही तयार झालेली नाही. त्यामुळे शेंद्रा येथील दक्षिण कोरियन कंपन्यांच्या गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सोयी ‘पायलट प्रकल्प’ ठरण्याची शक्‍यता आहे.

Web Title: marathi news aurangabad news oric mission south korea magnetic maharashtra